
Maghi Ganesh Jayanti 2023 Messages: भगवान शिव आणि माता पार्वतीच्या लाडक्या पुत्रासाठी म्हणजे भगवान गणेशाच्या भक्तांसाठी गणेश जयंतीचा उत्सव अतिशय खास आहे, गणेशाचे भक्त माघी गणेश जयंतीमोठ्या थाटामाटात साजरी करतात.माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला माघी गणेश जयंती साजरी केली जाते. विशेषतः महाराष्ट्रात या उत्सवाचा वेगळा जल्लोष पाहायला मिळतो. पौराणिक मान्यतेनुसार या शुभ तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला होता.माघी गणेश जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अग्नि पुराणानुसार ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी उपवास करावा आणि विधीपूर्वक गणेशाची पूजा करावी. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर जयंतीच्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे प्रियजनांना पाठवा आणि माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा द्या आणि हा सण तुमच्या प्रियजनांसाठी आणखी खास बनवा.
पाहा, खास शुभेच्छा संदेश





गणेश जयंतीचा दिवस प्रत्येक गणेश भक्तासाठी खास असतो, गणेश जयंतीच्यानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, दरम्यान, भगवान गणेशाची मनोभावे पूजा केल्यास तुमचे सर्व दु:ख होतात, त्यामुळे बाप्पाची पूजा पूर्ण मनाने करा. बाप्पा तुम्हाला भरभरून देईल.