World Music Day 2022 Marathi Songs: जागतिक संगीत दिनानिमित्त ऐका 'ही' मनाला शांती आणि प्रेरणा देणारी मराठी गाणी, Watch Video
Music (PC - Facebook)

World Music Day 2022 Marathi Songs: संगीत हे प्रत्येक दुखण्यावरील औषध आहे असे म्हणतात. मानसिक आरोग्य राखण्यासाठी संगीत थेरपी खूप प्रभावी आहे. दरवर्षी 21 जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. संगीत हा कलेचा एक प्रकार आहे ज्याचे माध्यम ध्वनी आहे. संगीतामध्ये आपण आपल्या भावना स्वर आणि लय याद्वारे व्यक्त करतो. हा दिवस फ्रेंच फॉर मेक म्युझिक डे किंवा वर्ल्ड म्युझिक डे म्हणूनही ओळखला जातो.

भारतात शास्त्रीय संगीत आदी काळापासून आहे. भगवान शंकर हे संगीताचे मूळ स्त्रोत आहेत. त्यांच्या डमरू आणि कृष्णाच्या बासरीतून संगीताचे सूर उमटले आहेत. तुम्हाला संगीताची आवड असेल तर तुम्ही या दिवशी मराठीतील काही खास गाणी ऐकून हा दिवस आणखी स्पेशल करू शकता. संगीत दिनाचे औचित्य साधून मराठीतील ही मनाला शांती देणारी आणि प्रेरणा देणारी गाणी नक्की ऐका.

असं म्हणतात की, ब्रह्माजींनी संगीत रचले होते. ब्रह्माजींनी विद्येची देवी सरस्वती यांना संगीत शिकवले. देवी सरस्वतीने नारदजींना संगीत पाठवले, नारदजींनी महर्षी भरताकडे आणि महर्षी भरताने नाट्यकलेच्या माध्यमातून संगीत जनमानसात आणले. याशिवाय सूरदासांची पदावली, तुलसीदासांची चौपाई, मीराची भजने, कबीरांची दोहे, संत नामदेवांची अभंग, आदींनी संगीत चिरंतन ठेवले आहे.