Last-Minute Diwali 2024 Rangoli Designs: दिवाळी 2024 च्या शुभेच्छा! (दिवाळीच्या शुभेच्छा) दिवाळी हा भारतातील आणि जगभरातील हिंदूंमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा विशेष सण आहे. दिवे आणि दिव्यांच्या हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो आणि प्रत्येक दिवस एका विशेष उत्सवाला समर्पित असतो. यावर्षी 28 ऑक्टोबर 2024 ते 1 नोव्हेंबर 2024 या कालावधीत दिवाळी हा सण साजरा केला जात आहे. दिवाळी सेलिब्रेशनसाठी लोक त्यांच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आणि अंगण सजवतात आणि सुंदर रांगोळीही काढतात. घरांच्या प्रवेशद्वारावर काढलेल्या रांगोळीमुळे सणाची शुभता तर वाढतेच, शिवाय सणाचा उत्साहही द्विगुणित होतो. दिवाळीत फुलं आणि विविध प्रकारच्या रंगांनी रांगोळीची रचना केली जाते. देशभरात दिवाळी साजरी होत आहे. दरम्यान, दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांच्या आणि विविध रंगांच्या साहाय्याने सुंदर रांगोळी काढून तुम्ही या सणाची शोभा वाढवू शकता. यासाठी तुम्ही या व्हिडिओ ट्युटोरियल्सची मदत घेऊ शकता.
दिवाळीनिमित्त काढता येतील असे हटके रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ
हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी पाच दिवसांचा दिवाळी सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीपासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भाऊदूजच्या उत्सवाने संपतो. दिवाळीच्या काळात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या काळात लोक त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांसह मिठाई आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. दिवाळीच्या काळात पाच दिवस सर्वत्र आनंद, उत्साह, उत्सव आणि अध्यात्माचे वातावरण असते.