Lalbaugcha Raja Visarjan 2021: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच असणार परवानगी, नागरिकांसाठी लाईव्ह दर्शनाची सुविधा
LALBAUGCHA RAJA 2021 । PC: You Tube/ Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja Visarjan 2021:  आज सर्वत्र अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई महापालिकेने विसर्जनासाठी गाइडलाइन्स ही जाहीर केल्या आहेत. तर आज विविध मानाच्या गणपतीसह अन्य परिसरातील मोठ्या गणपतींचे हे विसर्जन केले जाणार आहे. मात्र लालबागची शान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थितीती लावतात.परंतु कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यंत साधेपणाने विसर्जन सोहळा गेल्या वर्षापासून पार पाडला जात आहे. तर यंदा सुद्धा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा फक्त 10 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. परंतु पूर्णपणे लसीकरण झालेल्यांनाच यासाठी परवानगी असणार आहे.(Anant Chaturdashi 2021: अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईत पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था तैनात)

गणपतींचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना आधीच मंडळांमध्ये येऊ नये असे आवाहन करण्यात आले होते. त्याचसोबत मुंबई पोलिसांनी मंडळांना गणशेभक्तांसाठी लाईव्ह दर्शनाची सुविधा सुरु करावी असे स्पष्ट केले होते. तर आज पार पडणाऱ्या विसर्जन सोहळ्यासाठी सुद्धा गर्दी होणार नाही आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे सांगितले आहे. लालबागच्या राजाचा दिमाखात पार पडणारा विसर्जन सोहळा दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. मात्र यावेळी नागरिकांना गर्दी करण्यास मज्जाव असणार आहे. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा हा नागरिकांसाठी लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी म्हटले आहे.(Ganesh Visarjan Guidelines: गणेश विसर्जनासाठी महापालिकेकडून नियमावली जाहीर, मुंबईत 25 हजार कर्मचारी तैनात)

Tweet:

दरवर्षीच्या मार्गाने लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मात्र तो लवकरात लवकर उरकला जाईल याकडे ही लक्ष दिले जाईल. त्याचसोबत गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला सकाळी 10.30 वाजता निघणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत त्याचे विसर्जन केले जाणार आहे.