Ganesh Visarjan Guidelines: मुंबईतसह अन्य ठिकाणी उद्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे अंतर चतुर्दशी निमित्त मुंबई महापालिकेने 25 हजार कर्मचारी, रुग्णवाहिका आणि जेट स्की तैनात केले आहेत. त्याचसोबत उद्याच्या विसर्जन सोहळण्यासाठी महापालिकेने गाइडलाइन्स ही जाहीर केल्या आहेत.महापालिकेने असे म्हटले की, नागरिकांनी कृत्रिम तलावात गणेश मुर्तींचे विसर्जन करावे. त्याचसोबत गर्दी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. तर बाप्पाच्या विसर्जनाला उपस्थिती लावणाऱ्या 10 जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे. त्याचसोबत कोविड19 च्या नियमांचे सुद्धा उल्लंघन होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे महापालिकेन आवाहन केले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी स्पेशल व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 173 कृत्रिम तलाव आणि 72 विसर्जनाची स्थळ असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.(Ganesh Visarjan 2021 At Home: घरच्या घरी POP गणेशमूर्तीचं देखील पर्यावरणपूरक विसर्जन कसं कराल? पुणे महानगर पालिकेने शेअर केली माहिती)
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या विधानात महापालिकेने असे म्हटले आहे की, जवळजवळ 715 लाइफगार्ड्सला नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या येथे तैनात करण्यात आले आहे. तसेच फुल, हार किंवा अन्य गोष्टींसाठी 338 निर्माल्य कलश उभारण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 182 फिरते निर्माल्य कलश नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. 185 मोबाइल कंट्रोल रुम्स आणि 144 वैद्यकिय सेंटर्स आणि 39 रुग्णवाहिका तैनात असणार आहेत.
नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी पूजा किंवा आरती घरच्या घरीच करावी. विसर्जनाच्या ठिकाणी पूजा-आरती करण्याचे टाळावे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, नागरिकांनी घराजवळच्या कृत्रिम तलावाचा किंवा फिरत्या तलावाचा माध्यमातून मुर्तीचे विसर्जन करावे. त्यावेळी गर्दी होणार नाही याचे सुद्धा भान ठेवावे. 145 रिसेप्शन रुम्स, 84 तत्काळ टॉयलेट्स, 3807 फ्लडलाइट्स, 116 सर्च लाइट्स, 48 ऑब्जर्वेशन टॉवर्स, 36 मोटार बोट्स आणि 30 जर्मन राफ्ट्स हे विसर्जनाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.