2 ऑक्टोबर हा राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीप्रमाणेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा देखील जन्मदिवस असतो. वाराणसी मध्ये जन्मलेले लालबहादूर शास्त्री भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही सेनानी होते. मग अशा या महान नेत्याला जयंती निमित्त अभिवादन करत त्यांच्याच काही वचनांना आज तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्यासोबत शेअर करून WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Images द्वारा शेअर करायला विसरू नका.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या निधनानंतर 1964-66 असा दोन वर्षांचा कारभार लाल बहादूर शास्त्री यांनी सांभळला. मात्र ताश्कंद करारासाठी गेले असता त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जातो. दरम्यान त्यामुळे त्यांचे निधन झाले. पण पंतप्रधान कार्यलयाने शास्त्रीजींच्या निधनाचं कारण जाहीर करण्यात नकार दिला.
लाल बहादूर शास्त्री यांचे कोट्स
शास्त्रीजी अकरा वर्षांचे असताना बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले आणि पुढे त्यांच्यासोबतच कामाला लागले.