लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) या भारताच्या दुसर्या पंतप्रधानांची आज जयंती आहे. 2 ऑक्टोबर 1904 साली लाल बहादूर शास्त्रींचा वाराणसी मध्ये जन्म झाला होता. एका गरीब घरात जन्माला आलेले शास्त्रीजी पुढे गांधींजींच्या प्रभावाखाली आहे. त्यांचा राजकीय प्रवास सुरूवातीला स्वातंत्र्यलढ्याशी होता नंतर हळूहळू ते भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्रीं च्या नावाला एकमताने पसंती देण्यात आली होती. पण दुर्देवाने त्यांच्या वर विषप्रयोग झाला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. अवघ्या दोन वर्षांसाठी त्यांच्याकडे पंतप्रधान पद राहिले.
लालबहादूर शास्त्री यांचा 'जय जवान जय किसान' नारा सारा देशभर निनादला होता. आज त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत शास्त्रीजींना जयंतीच्या दिवशी अभिवादन करण्यासाठी WhatsApp Messages, WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Images द्वारा या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा द्या.
लालबहादूर शास्त्री यांची जयंती
सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंदला गेले असता रशियन स्वयंपाकी कडून लालबहादूर शास्त्री यांच्यावर विषप्रयोग केल्याचा दावा केला जातो. याप्रकरणी स्वयंपाक्याला अटकी झाली होती पण नंतर त्याची सुटका झाली. दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाकडून ही मृत्यूच्या कारणाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही.