Krishna Janmashtami 2021 Date: श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहिकाला उत्सव यंदा कधी साजरा केला जाणार?
Krishna Janmashtami 2021 (Photo Credits: YouTube)

Date of Krishna Janmashtami  2021: जन्माष्टमीचा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो. हिंदू श्रद्धेनुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म याच दिवशी झाला होता. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी हा सण खूप खास आहे. लोक या दिवशी उपवास ठेवतात आणि रात्री 12 वाजता कृष्णाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो. भगवान श्रीकृष्ण मथुरातील कंसाच्या कारागृहात देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्माला आले होते. भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव हा कृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो तर त्याच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला साजरा करण्याची पद्धत आहे. हा उत्सव दहिकाला उत्सव म्हणून देखील ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने वृंदावन, गोकूळ, मथुरा, द्वारका, जन्नाथपुरी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. (September 2021 Festival Calendar: सप्टेंबर महिन्यातील उपवास, सण आणि विशेष तारखा! पहा कधी होणार गणपती बाप्पांचे आगमन )

जन्माष्टमी कधी आहे?

यंदा 2021 मध्ये जन्माष्टमीचा सण 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. अष्टमी तिथी 29 ऑगस्ट रोजी रात्री 11.25 पासून सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी दुपारी 01.59 वाजता संपेल. रोहिणी नक्षत्र 30 ऑगस्ट रोजी सकाळी 06.39 वाजता सुरू होईल आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 09.44 वाजता संपेल. पूजेची वेळ 30 ऑगस्टच्या रात्री 11.59 ते 12.44 पर्यंत असेल. या मुहूर्ताचा एकूण कालावधी 45 मिनिटे आहे. जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट ला गोपाळकाला साजरा करण्यात येईल.

जन्माष्टमी व्रताचे नियम

या व्रतामध्ये अन्न ग्रहण केले जात नाही. हा उपवास एका ठराविक कालावधीत सोडला जातो. सामान्यत: अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या समाप्तीनंतर जन्माष्टमीचा उपवास सोडला जातो. यापैकी एकही मुहूर्त सूर्योदयानंतर सूर्यास्तापूर्वी संपत नसेल तर सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. जर या दोन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आधी संपला, तर त्या वेळानंतर जन्माष्टमीचा उपवास सोडता येतो.