Kokani Malvani Holi Shimga Garhane: जगभरात होळी आणि धुलीवंदनाचा उत्साह पाहायला मिळत आहे, यंदा 6 मार्च रोजी म्हणजे आज होळी आहे. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. दरम्यान, कोकणात होळी सणाचे खूप महत्व असते, कोकणात होळीचा सण आठवडाभर साजरा केला जातो. शिमगोत्सवामध्ये होळी पेटवण्यापासून रंगांची उधळण, स्थानिक ग्रामदेवतांची पालखी नाचवणं, जळती लाकडं फेकण्याचा खेळ अनेक प्रकार पहायला मिळतात. कोकणात शिमग्याचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात कोकणातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी निघते. पालखीच्या कार्यक्रमादरम्यान देवकार्य केले जाते. प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचा दिवस वेगवेगळा असतो, परंतु मालवणी गाऱ्हाणेची मज्जा वाटत निराळी असते, दरम्यान, आम्ही काही होळीचे मालवणी गाऱ्हाणे प्रार्थना घेऊन आलो आहोत, पाहा [हे देखील वाचा: Shimga Wishes 2023: शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना द्या शुभेच्छा]
शिमगा होळीचे मालवणी गाऱ्हाणे
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा.....
होय महाराजा...
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
होय महाराजा.....
कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा......
होय महाराजा.....
कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा......
होय महाराजा........
हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा........
होय महाराजा.......
हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नाय नाट कर रे महाराजा.....
होय महाराजा....
ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय. चला आता सगळ्यांनी पाय पडा आणि शिमगो खेळाक यवा आणि पाणी नाय वापरलास तर बरा व्हयत.
बोला होळी रे होळी, पुरणाची पोळी
होळी सणामध्ये गाऱ्हाण्याचे विशेष महत्व असत, होळी सण अनेक ठिकाणी बोंब मारून साजरा केला जातो, तसेच गाऱ्हाण्याचेही विशेष महत्व असते.