Kojagiri Purnima Wishes in Marathi : नवरात्रीचा सोहळा उत्साहात साजरा केला. 2 वर्षापासून कोरोनामुळे अनेक सण साजरे करता आले नाही. अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्राचे प्रतिबिंब केशरयुक्त दूधात पाहुन त्याचा आस्वाद घेतला जातो. म्हणून यास 'कौमुदी पौर्णिमा' असेही म्हणतात.शरद पौर्णिमा ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ तिथी मानली जाते. यावर्षी शरद पौर्णिमा रविवार, 9 ऑक्टोबर रोजी आहे. असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. या गोड सणाचे शुभेच्छाही गोड असणे आवश्यक आहे. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजनांना शुभेच्छा द्या. शुभेच्छा संदेश, wishes, Messages, GIF's इत्यादीच्या माध्यमातून तुम्ही शेअर करू शकता.
पाहा, शुभेच्छा संदेश
कोजागिरीचे खास संदेश प्रियजनांना पाठवून खास उत्सवाचा गोडवा आणखी द्विगुणीत करा. निर्बंध उठवल्यानंतर प्रत्येक सण आनंदात साजरे केले जात आहे. सध्या कोरोनाची आकडेवारी नियंत्रणात आहे. परंतु गर्दीच्या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे.