Kharmas 2021 (PC - File Image)

Kharmas 2021: पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष 14 मार्चपासून सुरू होत आहे. या दिवशी प्रतिपदेची तारीख असेल. त्यामुळे या दिवसापासून म्हणजेचं आजपासू खरमास ला सुरूवात होत आहे. खरमास काळात शुभ कार्य केली जात नाहीत. विवाह, मुंडन, गृह प्रवेश तसेच कोणतीही नवीन कामं या काळात वर्ज केली जातात. पौराणिक मान्यतानुसार खरमास काळ शुभ मानला जात नाही.

खरमास म्हणजे काय?

जेव्हा सूर्य बृहस्पति, धनु किंवा मीन राशीच्या चिन्हात येतो तेव्हा खरमास आरंभ होतो. लग्न, दाढी, गृह प्रवेश आणि यज्ञ अशी शुभ कार्य खरमामध्ये केली जात नाहीत. खरमामध्ये पूजा पाठ इत्यादींचे विशेष महत्त्व असते. दरम्यान, खरमास ला दुष्ट मास म्हणूनही ओळखलं जाते. असं म्हटलं जात की, खरमामध्ये सूर्याची गती कमी होते. खरमास ला आजपासून म्हणजेचं 14 एप्रिल 2021 रोजी सुरूवात होणार आहे. (वाचा - Amarnath Yatra 2021: यंदा 28 जून ते 22 ऑगस्ट दरम्यान होणार अमरनाथ यात्रा)

खरमासमध्ये या गोष्टींच लक्ष ठेवा -

खरमामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेचे विशेष महत्त्व आहे. खरमास काळात भगवंताचे स्मरण करणे आवश्यक असून जीवनात अध्यात्माचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. या काळात दान करण्यास विशेष महत्त्व आहे. खरमास मध्ये अधिपती देवतेची उपासना केल्यास शुभ परिणाम होतात. ज्यांना आपल्या आयुष्यात सूर्याशी संबंधित त्रास आहे, अशा व्यक्ती खरमसात सूर्यदेवाची पूजा करतात. यामुळे सूर्याशी संबंधित दोष दूर करण्यास मदत होते.

होलीच्या 8 दिवस अगोदर होलाष्टकचा प्रारंभ होतो होतो. ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आलं आहे की, जेव्हा खरमास आणि होलाष्टकचा प्रारंभ होतो, तेव्हा कोणतेही नवीन काम केले जात नाही. खरमास आणि होलाष्टक काळात शुभ काम करणे टाळले जाते. होळी पेटल्यानतंर होलाष्टकचा शेवट होतो. ज्योतिषानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमी ते फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तारखेपर्यंतचा कालावधी होलाष्टक म्हणून मानला जातो. या वेळी 22 मार्चपासून होलाष्टकास प्रारंभ होत असून 28 मार्चपर्यंत म्हणजेच होलिका दहनपर्यंत तो प्रभावी असेल.