
Kargil Vijay Diwas Messages: उद्या 26 जुलै म्हणजे कारगिल विजय दिवस. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारताने विजय मिळवला आणि तेव्हापासून हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जावू लागला. यंदा या विजयाचे 22 वे वर्ष आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त देशवासिय देशभक्तीपर मेसेजेस, विशेस, इमेजेस, ग्रीटिंग्स सोशल मीडिया माध्यमातून शेअर करुन या दिवसाचा आनंद साजरा करतात. म्हणूनच कारगिल विजय दिवसानिमित्त तुमच्यासाठी खास Messages, Wishes, Greetings घेऊन आलो आहोत. सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) द्वारे शेअर करुन या दिवसाचा आनंद साजरा कराच पण त्याचबरोबर युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे देखील स्मरण करा.
कारगिल विजय दिवसानिमित्त पंतप्रधान इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट देऊन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्याचबरोबर अनेक देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा!





आक्रमण, शत्रु हल्ले इत्यादींपासून संरक्षण करण्यात भारतीय सेना महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आतापर्यंत अनेक जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली असेल. त्यामुळेच त्यांच्या कार्याची जाण ठेवून वेळप्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना मदत करुन आपणही आपण आपले कर्तव्य निभावूया.