
प्रत्येक महिन्यामध्ये दोनदा एकादशीचं व्रत केले जाते. या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशिर्वाद आपल्यावर रहावा यासाठी प्रार्थना केली जाते. पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला कामदा एकादशी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या कामदा एकादशीला चैत्र वारी म्हणून देखील ओळखलं जाते. या दिवशी पंढरपुरात विठूरायाच्या मंदिराला फुलांची आकर्षक रोषणाई केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, कामदा एकादशीला व्रत केल्याने जीवनात सुख, समृद्धी राहते.
चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीची तिथी 7 एप्रिल दिवशी रात्री 8 वाजता सुरू होणार आहे आणि दुसर्या दिवशी रात्री 9 वाजून 12 मिनिटांपर्यंत असणार आहे. कामदा एकादशी उदय तिथीनुसार, 8 एप्रिलला साजरी होईल. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना, प्रियजणांना WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
कामदा एकादशीच्या शुभेच्छा

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म




कामदा एकादशी दिवशी दिवसभर अनेकजण व्रत ठेवतात. दुसर्या दिवशी म्हणजे द्वादशीला त्याचे पारणं केलं जातं. महाराष्ट्रात या कामदा एकादशी निमित्त चैत्री वारी करतात. अनेक जण पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात.