Jyestha Gauri Avahana 2020: गौरी आवाहनाच्या रात्री गौराईला सहावारी, पेशवाई नऊवारी साडी नेसवून आकर्षकरित्या कसे सजवाल? (Watch Video)
Gauri Pujan

महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या पाठोपाठ आज (25 ऑगस्ट) गौराईचं आगमन होणार आहे. राज्यभरात स्थानिक संस्कृती आणि परंपरांनुसार ज्येष्ठा, कनिष्ठा गौरींचं आगमन (Jyestha Gauri Avahana) केलं जाणार आहे. साधारणपणे महाराष्ट्रात गणेशोत्सवात अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करून गणेशोत्सवा दरम्यान गौरी पूजनाचा कार्यक्रम केला जातो. यंदा देखील आज संध्याकाळी घराघरात गौरीचं आगमन (Gauri Aagaman) होणार आहे. रात्री गौरींना सजवण्यासाठी घरातील माहेशवाशिणी-सुना एकत्र येणार आहेत. मग गौरीच्या पुतळ्याला अगदी बाईप्रमाणे सजवण्यासाठी तुम्ही देखील सज्ज असाल तर पहा झटपट आणि रेखीव पद्धतीने सहावारी, पेशवाई नऊवारी  साडी कशी नेसवाल? Gauri Pujan 2020 Wishes: गौरी पूजन निमित्त मराठी Messages, Images, Whatsapp Status वर शेअर करुन द्या खास शुभेच्छा!

पूर्वी पारंपारिक पद्धतीने केवळ प्रतिकात्मक स्वरूपात गौरी आणण्याची पद्धत होती. मात्र आज गौरीचा पुतळा विविध स्वरूपात उपलब्ध आहे. मग पार्वतीच्या रूपाने घरात आलेल्या गौराईचा साज श्रृंगार करून तिला नटवण्यासाठी खालील व्हिडिओज नक्की पहा. Gauri Pujan 2020 Muhurat: यंदा कधी होणार गौरीचं आगमन? जाणून घ्या गौरी पूजनाचा मुहूर्त आणि पुजा विधी.  

गौराईला सजवण्यासाठी खास तयारी

बसलेल्या गौराईला साडी नेसवण्याची पद्धत 

पेशवाई नऊवारी

आज रात्री गौराईचं आगमन झाल्यानंतर उद्या गौरी पूजनाच्या कार्यक्रमामध्ये लेकी-सुनांकडून गौराईला पूजलं जातं. गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. माहेरवाशिणी स्त्रिया मैत्रिणींसोबत फुगड्या, झिम्मा खेळून अख्खी रात्र जागवतात. दुसर्‍या दिवशी गणपती सोबत गौराईचं देखील विसर्जन करण्याची प्रथा आहे.