Janmashtami 2019 Recipes: गोकुळाष्टमीचा खास प्रसाद गोपाळकाला आणि सुंठवडा घरच्या घरी कसा बनवाल? (Watch Video)
Krishna Janmashtami Prasad Recipeas (Photo Credits: Youtube)

Krishna Janmashtami Prasad Recipes:  श्रावण (Shravan 2019) वद्य अष्टमीला श्रीकृष्णाच्या जन्मदिनी देशविदेशात गोकुळाष्टमीचा सोहळा मोठया स्तरावर साजरा केला जातो. यंदा 23 ऑगस्ट 2019 ला गोकुळाष्टमीचा मुहूर्त आहे.  पुराणानुसार, भगवान श्रीकृष्ण (Lord Krishna) हा विष्णूचा (Lord Vishnu) आठवा अवतार असल्याचे मानले जाते, अष्टमीच्या मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला होता, यानंतर कंसापासून रक्षण करण्यासाठी पिता वासुदेवाने त्याला नंदाच्या घरी गोकुळात पोहचवले. आजवर या बालगोपाळाच्या अनेक गोष्टी आपण  ऐकल्या असतील, यातीलच एक लीला म्हणजे कृष्ण आणि गोपाळकाला. अजूनही गोकुळाष्टमीच्या निमित्ताने कृष्णाला प्रसाद म्हणून गोपाळकाला (Gopalkala)  हा पदार्थ बनवला जातो. याशिवाय कृष्ण अष्टमीच्या निमित्ताने सुंठवडा (Sunthvada) हा पदार्थ देखील बनवला  जातो.

यंदा तुम्हाला देखील हा कृष्णाच्या आवडीचा प्रसाद घरच्या घरी बनवायचा असेल तर या सोप्प्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच मदत करतील...(Krishna Janmashtami 2019: श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचं महत्त्व काय? यंदा गोकुळाष्टमी चा उपवास, पूजा कधी कराल?)

असा बनवा गोपाळकाला 

(Krishna Janmashtami 2019: भगवान श्रीकृष्णाच्या 'या' मंत्रांचा जप करा, दुर होतील आयुष्यातील समस्या)

सुंठवडा रेसिपी 

कृष्णकथांमधून या गोपाळकाला विषयी एक खास आख्यायिका प्रसिद्ध आहे,  यानुसार एकदा कृष्णाने आपल्या संवंगड्याना जमा करून प्रत्येकाला त्याच्या घरून  काही ना काही खाद्यपदार्थ घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार आपापल्या यथाशक्ती कोणी, दही, कोणी दूध, कोणी कुरमुरे तर कोणी भाकरी असे पदार्थ आणले. मग कृष्णाने हे सारे पदार्थ एकत्र करून काला बनवला. असं म्हणतात, की या पदार्थाची चव इतकी उत्तम झाली होती की याचा आस्वाद घेण्यासाठी स्वतः देवांनी देखील माशाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. मात्र कृष्णच्या सवंगड्यांनी  तोवर हा काला फस्त केल्याने त्यांना या चवीला मुकावे लागले होते .

दरम्यान, यंदा 23 व 24 ऑगस्ट या तारखांमध्ये काहीसा गोंधळ होता मात्र तिथिनुसार 23 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी गोकुळाष्टमी मुहूर्त सुरु होणार असून 24 ऑगस्ट म्हणजे शनिवारी गोपाळकाला साजरा केला जाणार आहे.