Janmashtami 2019: देशभरात कृष्ण जन्माष्टमीसाठी सजली मंदिरं; ‘सशक्त भारत-समृद्ध भारत-अखण्ड भारत' या संकल्पनेवर मथुरा मध्ये साजरा होणार कृष्णजन्मोत्सव
Mathura (Photo Credits: Twitter)

Mathura Janmashtami 2019 Celebrations:  भगवान श्रीकृष्ण (Lord Krishna) यांचे जन्मस्थळ समजली जाणारी मथुरा नगरी यंदाच्या श्रीकृष्णजन्मोत्सवासाठी (Janmashtami) सज्ज झाली आहे. आज (23 ऑगस्ट) च्या मध्यरात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्मसोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मथुरेसह देशभरातील मंदिरांवर आकर्षक फुलांची आणि दिव्यांची आरास करण्यात आली आहे. आज देशा-परदेशातील इस्कॉन मंदिरांचाही समावेश आहे.. मथुरेमध्ये यंदा भगवान श्रीकृष्णाचा जन्म ‘सशक्त भारत-समृद्ध भारत-अखण्ड भारत' या संकल्पनेवर आधारित आहे.

कृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान कडून श्रीकृष्णचा 5246 वा जन्म महोत्सव यंदा‘समृद्ध भारत-सशक्त भारत-अखण्ड भारत' या संकल्पनेवर आधारित साजरा केला जाणार आहे. यंदा गोकुळाष्टमी चा उपवास, पूजा कधी कराल?

जन्माष्टमी 2019 सेलिब्रेशनसाठी मथुरा सज्ज 

 

भगवतगीतेतील श्रीकृष्णाचे उपदेश

भगवान कृष्ण हे विष्णूचे आठवे अवतार असल्याचं सांगितले जाते. धर्म रक्षण आणि दुर्जनांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी श्रीकृष्ण यांनी श्रावण वद्य अष्टमी दिवशी पृथ्वीतलावर जन्म घेतला अशी आख्यायिका आहे. जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला हा दिवस दहीहंडी बांधून मानवी थरांच्या मदतीने ती फोडली जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे शहरात या दिवशी ठिकठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन केलं जाते.