International Mother Language Day 2019:  21 फेब्रुवारी दिवशी जागतिक मातृभाषा दिवस का साजरा केला जातो?
International Mother Language Day 2019 (Photo Credits: Pixabay)

International Year of Indigenous Languages: जगभरात 21 फेब्रुवारी हा दिवस International Mother Language Day म्हणजेच जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राकडून (UN)  2000 पासून हा दिवस साजरा करायला सुरूवात झाली. आज जागतिकीकरणाच्या,डिजिटलायझेशनच्या जमान्यामध्ये अनेक प्राचिन भाषा लोप पावत चालल्या आहेत. यामधून समाजात भाषेती ल आणि संस्कृतीमधील विविधता जपण्यासाठी प्रयत्न केले जातात. यंदाचं वर्ष म्हणजे 2019 हे साल International Year of Indigenous Languages म्हणून साजरं केलं जातयं. यंदाचं सेलिब्रेशन Indigenous languages as a factor in development, peace and reconciliation या विषयी आहे. म्हणजे आपल्या स्थानिक भाषांचा आपल्या विकासामध्ये, शांतता प्रस्थापित करण्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो याला प्रोत्साहन दिले जाणार आहे. International Mother Language Day 2019: भारतीय भाषांबद्दल या '10' खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

जगभरातील 6000 विविध बोली भाषामधील 43% भाषा धोक्यामध्ये आहेत. शिक्षण व्यवस्थेमध्ये आज अत्यंत मोजक्या भाषेमध्ये शिक्षण उपलब्ध करून केलं जातं. मुलांच्या मानसिक, बौद्धिक विकासासाठी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेमध्ये होणं गरजेचे आहे. यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

International Mother Language Day चं सेलिब्रेशन कसं सुरू झालं?

भारत पाकिस्तानाच्या फाळणीमध्ये जागतिक मातृभाषा दिवसाच्या सेलिब्रेशनचं मूळ आहे. भारत- पाकिस्तानामध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची राष्ट्रीय भाषा ही उर्दू असेल असे सांगण्यात आले. मात्र पश्चिम पाकिस्तान म्हणजे बंग्लादेशातील स्थानिकांना हे मान्य नव्हते. यासाठी त्यांनी मोहिम सुरु केली. 1956 साली बंगाली ही पाकिस्तानातील दुसरी अधिकृत भाषा झाली. या लढ्यात अनेकांनी बलिदानही दिले आहे.

जगाच्या इतिहासात भाषेसाठी छेडण्यात आलेली ही विशेष मोहिम लक्षात घेता संयुक्त राष्ट्राने स्थानिक भाषा आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी 21 फेब्रुवारी दिवशी जागतिक स्तरावर मातृभाषा दिवस साजरं करण्याचं ठरवलं. बांग्लादेशामध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस Language Movement Day किंवा Shohid Dibosh म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बांग्लादेशात सुट्टी असते. तर भारतामध्ये पश्चिम बंगाल भागामध्ये भाषा दिवस म्हणून 21 फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो.

यंदाचं सेलिब्रेशन कसं असेल?

2019 हे वर्ष म्हणून International Year of Indigenous Languages जहीर करण्यात आल्याने जगभरातील स्थानिक भाषांमधील 'म्हणी' (Proverb ) एकत्र केल्या जाणार आहेत. यासाठी जगभरातून लोकांनी त्यांच्या मातृभाषेमध्ये वापरात असलेल्या म्हणी संयुक्त राष्ट्राला पाठवायच्या आहेत. मात्र या म्हणींचा वापर प्रामुख्याने शांतता, सैख्य, आनंद यासाठी वापरात असणं आवश्यक आहे. निवडक म्हणींची UN website आणि इतर डिजिटल कम्युनिकेशन टूल्सवर प्रकाशित केले जाणार आहेत.

आज भारतीय सिनेमा, टेलिव्हिजनवरही केवळ विविध भाषा नव्हेच तर प्रत्येक बोली भाषेलाही वाव मिळत आहे. महाराष्ट्रात विशिष्ट मैलापलिकडे जशी पदार्थांची चव बदलते तशीच बोली भाषादेखील बदलते. महाराष्ट्रात मराठी ही प्रमाण भाषा आहे तशीच कोकणी, वर्‍हाडी, ऐरणी भाषांची गोडी काही वेगळीच आहे.