1 जुलैला आंतरराष्ट्रीय जोक दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हसणे आणि हसवणे. जरी जग वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृतींमध्ये विभागले गेले असले तरी एक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला एकमेकांशी जोडलेली ठेवते, ती म्हणजे विनोद आणि व्यंग. हसु-आनंद, गंमती-विनोद या अशा गोष्टीआहेत ज्यांचे संवाद माणसाला माणसाशी जोडतात.आजच्या धकाधकीच्या जीवनात, तणाव कमी करून विनोद आपल्याला आनंदी ठेवण्यात खूप विशेष भूमिका निभावतात. तेव्हा आज या दिवशी विनोद सांगून आपल्या आसपासच्या लोकांना नक्की हसायला लावा. (International Joke Day 2021: खळखळून हसवणारे भन्नाट मराठी विनोद!)
आजच्या दिवशी आपल्या आजूबाजूच्या , परिवारातील लोकांना , मित्र- मैत्रिणींना एक जोक नक्की सांगा आणि हसवा. त्याच बरोबर खाली दिलेले HD Image, WhatsApp Status, Greetings, Facebook Image पाठवून शुभेच्छा द्या.
जगभरातील विनोदवीरांसाठी हा अगदी खास दिवस आहे. विनोदाला वयाचे बंधन नसते. कोणत्याही वयात आपण जोक्स क्रॅक करु शकतो. त्यामुळे हा दिवस जगातील सर्वच लोकांकडून साजरा केला जातो.