Deccan Queen | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारताली पहिली डिलक्स ट्रेन (India's First Deluxe Train) अर्थात दख्खनची राणी (Deccan Queen) आज आपल्या अविरत सेवेची 92 वर्षे पूर्ण करत आहे. ही ट्रेन मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडते. ब्रिटीश काळात या ट्रेनची सुरुवात झाली. भारतीय रेल्वेकडून सांगण्यात येते की, रेल्वेत स्वतंत्र रेस्टॉरंट असलेली ही एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन आता 22 डब्यांसह धावणार आहे. डेक्कन क्वीनमध्ये सुरुवातीला फक्त फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासची राहण्याची सोय होती. 1 जानेवारी 1949 रोजी पहिला वर्ग रद्द करण्यात आला आणि दुसरा वर्ग प्रथम श्रेणी म्हणून पुन्हा डिझाइन करण्यात आला. जो जून 1955 पर्यंत सुरु राहिला आहे.

डेक्कन क्विन ही ट्रेन 1 जून 1930 रोजी सुरु झाली. ही ट्रेन पुणे स्टेशनवरुन सकाळी सव्वासात वाजणेच्या सुमारास निघते. जवळपास सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते. ही ट्रेन मुंबईत पोहोचल्यानंतर त्यात दिवशी सायंकाळी 5.10 वाजता सीएसएमटीवरुन निघते. ती रात्री साधारण साडेआठ वाजणेच्या सुमारास पुण्याला पोहोचते. एका दिवशी ही ट्रेन साधारण 192 किरोमीटर अंतर एका बाजून कापते. (हेही वाचा, डेक्कन कवीन, पंचवटी एक्स्प्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस पुन्हा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल; इथे पहा वेळापत्रक)

डेक्कन क्विनला दख्खनची राणी म्हणून ओळखले जाते. या ट्रेनने प्रवास कारण्यासाठी आगोदरच तिकीट काढवे लागते. ट्रेनमध्ये पासहोल्डर्ससाठी तीन डबे असतात. हे डबे सोडल्यास सर्व तिकीटे ही केवळ आरक्षित प्रवाशांसाठीच असतात.