भारतात प्रत्येक 4 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय नौदल दिन (Indian Navy Day) म्हणून साजरा केला जातो. भारतीय नौदलाने (Indian Navy) केलेल्या उत्तूंग कामगिरीची माहिती देणे आणि त्या अभमानास्पद कामगिरीची नागरिकांना माहिती करुन देणे या उद्देशाने हा विशेष दिन साजरा केला जातो. आज इंडियन नेव्ही (Royal Indian Navy) अशी ओळख असलेल्या भारतीय नौदलाची स्थापना 1608 मध्ये ब्रिटीशांनी केली आहे. इंडीयन नेव्ही भारतीय जलहद्दीत पाण्याखाली, पाण्यावर आणि जलहद्दीच्या हवाई सीमेत सुरक्षा पाहते. शत्रूपासून देशाच्या सीमांचे रक्षण करणे, शत्रूंच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे यात नौदल प्रमुख जबाबदारी बजावते.
संरक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे काम चालते. जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल म्हणून भारतीय नौदलाची ओळख आहे. नौदलाकडे 155 युद्धनौका (प्राप्त आकडेवारीनुसार) आहेत. याशिवया शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स आणि सी हॅरियर्स यांसारख्या लढावू विमानांच्या तुकड्याही आहेत. इतकेच नव्हे तर क्षेपणास्त्रे डागणाऱ्या युद्धनौका आणि हेलकॉप्टर्स सोबत पाणबुडीही आहेत. आय.एन.एस. विराट डेली क्लास, त्रिशूळ, आयएनएस बेटवा या नौदलाकडील प्रमुख युद्धनौका आहेत.ट
भारतीय नौदल अलिकडील काळात अगदीच प्रगत झाले आहे. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची अण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत हीसुद्धा भारतीय नौदलात दिमाखाने उभी आहे. भविष्यात कधी अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची वेळ आली तर त्यासाठी नौदल सक्षम आहे.