Indian Coast Guard Day | File Image

Indian Coast Guard कडून 31 जानेवारी दिवशी 49 वा Raising Day साजरा केला आहे. ICG ची स्थापना तटरक्षक कायदा, 1978 द्वारे 1 फेब्रुवारी, 1977 रोजी करण्यात आली आहे. तटरक्षक दलाच्या महान कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यंदा भारतीयांना Indian Coast Guard Day च्या निमित्त WhatsApp Status, Messages, Wishes, Quotes शेअर करत भारतीय तटरक्षक दलाच्या सैनिकांना सलाम करा.

Indian Coast Guard ही एक बहु-मिशन संस्था आहे. हे समुद्रात वर्षभर वास्तविक जीवनातील ऑपरेशन्स करते. यात पृष्ठभाग आणि हवाई दोन्ही ऑपरेशनसाठी कार्य क्षमता आहे. भारतीय तटरक्षक दल हे देशाच्या सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे दल आहे, जे सागरी क्षेत्रांचे संरक्षण, चाचेगिरी आणि तस्करी रोखण्यात आणि सागरी आपत्तींपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अशा सैनिकांना त्यांच्या शौर्य आणि बलिदानासाठी सन्मानित करण्यासाठी भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो.

Indian Coast Guard च्या शुभेच्छा

Indian Coast Guard Day | File Image
Indian Coast Guard Day | File Image
Indian Coast Guard Day | File Image
Indian Coast Guard Day | File Image
Indian Coast Guard Day | File Image

वयम रक्षामः असे या Indian Coast Guard चे ब्रीदवाक्य आहे. 19 ऑगस्ट 1978 रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक दलाचे उद्घाटन करण्यात आले होते. भारतीय तटरक्षक दल भारतीय नौदल, मत्स्यव्यवसाय विभाग आणि राज्य पोलीस दलांसोबत सागरी सीमांचे रक्षण करण्याचं काम करते. हे भारतीय तटरक्षक दल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते आणि सागरी मार्गांमध्ये होणाऱ्या बेकायदेशीर कारवायांना प्रतिबंध करते. तसेच ते मच्छीमारांना समुद्रात मदत करते आणि सागरी जैवविविधता टिकवून ठेवण्याचे काम करते. सागरी मार्गाने होणाऱ्या दहशतवादी कारवाया असोत किंवा अंमली पदार्थांची तस्करी असो, भारतीय तटरक्षक दलाचे जवान प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असतात.