Independence Day 2022 Fancy Dress Ideas: 15 ऑगस्टला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी भगतसिंग ते महात्मा गांधींची वेशभूषा केल्यास तुम्हीच जिंकणार स्पर्धा, पाहा हटके ड्रेसिंग आयडीया

Independence Day 2022 Fancy Dress Ideas: भारतीय स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. देशासाठी लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. देशभरात स्वातंत्र्य दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. रस्ते, शाळा, कार्यालये इत्यादी ठिकाणे सजवले जातात आणि विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 15 ऑगस्टला अनेक शाळांमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा होतात. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी थोरांचे स्मरण म्हणून भगतसिंग ते महात्मा गांधी यांची वेशभूषा करण्याचे ठरवू शकतात. १५ ऑगस्ट रोजी हटके ड्रेसिंग कल्पनांसह शालेय स्पर्धा तुम्ही जिंकू शकतात, चला तर मग पाहूया.. [हे देखील वाचा: Independence Day 2022 Rangoli Designs: १५ ऑगस्टच्या उत्सवासाठी खास रांगोळी डिझाईन (व्हिडिओ पाहा)]

 भगतसिंग 

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पाहिल्यास, शौर्य, दूरदृष्टी आणि बलिदानाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून तुम्ही भगतसिंग यांना नक्कीच चुकवू शकत नाही. आपल्याला फक्त एक काळी टोपी आणि बनावट मिशीची आवश्यकता आहे. एक सामान्य शर्ट आणि पायघोळ हावा. तसेच, तुमच्या मुलाला इंकिलाब झिंदाबादचा नारा शिकवायला विसरू नका! तुम्ही तुमच्या लहानग्याला भगतसिंग यांच्या सारखी वेशभूषा करवून देऊ शकतात.

 झाशीची राणी 

तुमच्या लहान मुलीला पारंपारिक दागिन्यांसह महाराष्ट्रीयन स्टाईलची साडी घाला आणि तिला झाशीची राणीसारखी खेळणीतली तलवार आणि ढाल द्या. “मे मेरी झांसी नही दुंगी” हे वाक्य शिकवल्यास आणखी जिवंतपणा जाणवेल.

 पंडित नेहरू

पंडित नेहरू यांच्या सारखी वेशभूषा करणे सोपे आहे. तुम्हाला फक्त एक पांढरा कुर्ता पायजमा, एक नेहरू जॅकेट, गुलाबाचे फूल आणि एक टोपी हवी आहे. आणि तुमचे मूल चाचा नेहरूंच्या वेशभूषेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तयार आहे.

भारत माता 

तुमच्या मुलीला पांढऱ्या रंगाची साडी नेसवा. स्वातंत्र्य दिनासाठी तिच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेच्या लुकसाठी तुम्ही तिच्या डोक्यावर सोनेरी रंगाचा मुकुट देखील घालू शकता.

महात्मा गांधी

महात्मा गांधींना पांढरे धोतर गुंडाळा, टक्कल दिसण्यासाठी डोक्यावर त्वचेच्या रंगा टोपी घाला, बाजारात ती सहज मिळते.

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस यांच्या सारखी वेशभूषा करणेही आता सोपे झाले आहे. अनेक ठिकाणी बोस यांच्या सारखा पेहराव मिळतो. स्वातंत्र्यासाठी बोस यांनी केलेले कार्य खूप मोलाचे आहे.

मुलाला किंवा मुलीला त्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी क्रांतीकाराकांसारखे सजवणे खूप सोपे आहे. परंतु त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दलही त्यांना सांगा. भारताला  15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि देशभरात उत्सव साजरा केला होतो. शाळांमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धांद्वारे स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात उत्तम मार्ग आहे. २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी तुमच्या मुलाला शक्य तितक्या चांगल्या पोशाखात सजवायला विसरू नका. सर्वांना २०२२ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!