Independence Day 2022 Rangoli Designs: भारताचा स्वातंत्र्यदिवस जवळ आला आहे. या वर्षीचा स्वातंत्र्यदिवस खूप विशेष आहे. भारत सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि सरकारने या उत्सवाला 'आझादी का अमृत महोत्सव' असे नाव दिले आहे. ऐतिहासिक दिवस १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास २०० वर्षांच्या गुलामगिरीचा अंत झाला होता. त्यामुळे हा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील प्रत्येक नागरिक भारताचा स्वातंत्र्यदिवस अत्यंत उत्साहात साजरा करतो. 15 ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि हा स्वातंत्र्याचा भव्य सोहळा साजरा केला जातो, भारतात सण उत्सवात रांगोळी काढण्याचे खूप महत्व असते, प्रत्येक शुभ प्रसंगी दारापुढे रांगोळी काढली जाते, दरम्यान, भारतात स्वातंत्र्य दिवस उत्सवा सारखाच साजरा केला जातो, आणि उत्सव म्हंटल्यावर रांगोळी आलीच… तर आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्यदिनाला काढता येतील असे रांगोळीचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत. [हे देखील वाचा: Tiranga DP Images, HD Wallpapers for Free Download Online: सोशल मीडीयामध्ये प्रोफाईल पिक्चर 'तिरंगा' ठेवण्यासाठी डाऊनलोड करा 'भारतीय राष्ट्रध्वज' फोटो!]

 पाहा, रांगोळीचे व्हिडीओ :

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन 

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन 

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन 

स्वातंत्र्यदिनासाठी विशेष रांगोळी डिझाईन 

तिरंग्याची रांगोळी काढल्यानंतर ती चांगल्या ठिकाणी काढावी, आपल्या तिरंग्याला विशेष महत्व आहे आणि त्याच अपमान होईल असे कोणतेही कार्य करू नये, रांगोळी काढतांनाही या गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.