नि:स्वार्थी होऊन केवळ आपल्या मुलाला चांगलं आयुष्य, चांगले संस्कार, चांगले आरोग्य देण्यासाठी केविलवाणी धडपड करते ती म्हणजे आई. (Mother) ह्या आईचे करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अशा या आईला कौतुकाची एक थाप म्हणून मातृदिनाकडे(Mother's Day) पाहिले जाते. मात्र ह्या मातृदिनाबाबत लोकांचे अनेक तर्कवितर्क आहेत. म्हणूनच आज आम्ही तु्म्हाला मातृदिन नेमका कसा उद्यास आला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये हा कसा साजरा केला जातो, हे सांगणार आहोत.
आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते , धरणीची ठाय असते.... फ.मु.शिंदे च्या कवितेत आईचे केलेले हे वर्णन खरचं ह्द्याला स्पर्शून जाणारे आहे. आईची महती सांगावी तितकी कमीच. त्यामुळे नि:स्वार्थपणे प्रेम करणा-या ह्या आईला विशेष सम्मान देण्यात यावा, यासाठी हा मातृदिन... तसं आईचे आभार मानण्यासाठी कोणत्याही विशेष दिवसाची गरज नाही, परंतू तिला ही आपण इतरांसाठी किती महत्त्वाची आहे हे दाखवून देण्यासाठी हा दिवस. हा दिवस अमेरिका, जपान, ग्रीक, भारत आणि या 5 देशांसह जगभरात कसा साजरा केला जातो ते पाहूयात.
1908 मध्ये अमेरिकेत (America) पहिल्यांदा साजरा केला गेला 'मातृ दिवस'
मातृदिन सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाला ह्याबाबत जरी इतिहासकार संभ्रमात असले तरीही, मिळालेल्या माहितीनुसार, 1908 मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती वुड्रो विल्सन यांनी एक कायदा बनवला, ज्या अंतर्गत दरवर्षी मे महिन्याच्या दुस-या रविवारी 'मातृदिवस' साजरा केला जाईल. कारण साधारणपणे ह्या दिवसात शाळा-महाविद्यालयेही बंद असतात.
तर दुसरीकडे असंही सांगितलं जातं की, सर्वात आधी 'मातृदिन' जुलिया वॉर्ड होवे ने 1870 मध्ये सुरु साजरा केला. होवेद्वारा 1870 मध्ये निर्माण केलेल्या 'मदर डेज प्रोक्लामेशन'मध्ये प्रत्येक महिलेला किंवा आईला राजकीय स्तरावर आपल्या समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. ग्रीकमधील लोक वसंत ऋतूमध्ये आपल्या देवीच्या नावाने मातृत्व दिवस साजरा करतात.
ख्रिश्चन समाजाचा मातृदिन
ह्या समाजाचे लोक ह्या दिवशी चर्चमध्ये जाऊन आपल्या आईसाठी प्रार्थना करतात. तसेच आपल्या मातांना खास भेटवस्तू देऊन ह्या दिवशी आपल्या आईला पुर्णपणे आराम देतात. आपल्या आईसाठी तिच्या आवडीचे चमचमीत जेवण बनवले जाते.
जपानमधील (Japan) कसा साजरा केला जातो मातृदिन
जपानमध्ये महाराणी कोजुन (सम्राट अकिहिताची आई) च्या जन्मदिवस म्हणून साजरा केला जात होता. मात्र दिवसेंदिवस बदलत जाणारी बदलत जाणारी संकल्पना लक्षात घेता जपानमध्ये आपल्या आईसाठी मुले गुलाबाचे फूल देऊन आईविषयी प्रेम आणि सम्मान देतात.
चीनमध्ये (China) गरीब मातांना मदत करण्याची परंपरा
चीनमध्ये मुलं आपल्या आईला गुलाबाचे फूल किंवा सुंदर भेटवस्तू देऊन मातृदिन साजरा करतात. त्याचबरोबर ह्या दिवशी गरीब मातांना मदत करण्याचीही अनोखी परंपरा आहे.
Mother’s Day 2019 Gift Ideas: मदर्स डे निमित्त आईला सरप्राईज देण्यासाठी '5' बजेट फ्रेंडली आणि हटके गिफ्ट आयडियाज!
भारतात (India) कस्तुरबा गांधीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो मातृदिन
भारतात महात्मा गांधीजींची पत्नी कस्तुरबा गांधी ह्याच्या सन्मान साजरा केला जातो. 2003 मध्ये 11 एप्रिलला कस्तुरबा गांधीच्या जयंती दिवशी भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षित मातृदिन साजरा करण्याची घोषणा केली होती.