Happy Holi 2022 Messages: भारत हा सण आणि संस्कृतींचा देश आहे. भारतात प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळीचा सणही भारतात अतिशय उत्सहात साजरा केला जातो. होळीच्या सणाची खास गोष्ट म्हणजे हा सण केवळ भारतातचं नाही तर परदेशातही साजरा केला जातो. होळी हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी लोक आपल्या तक्रारी विसरून एक होतात. दोन वर्षांपासून कोरोनामुळे होळीचा रंग थोडा फिका पडला होता. पण यंदा ती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाणार आहे. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात. यासोबतच या दिवशी खास गेट टुगेदर, पार्ट्यांचेही आयोजन केले जाते.
हिंदू धर्मात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. पंचागानुसार होळी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. रंगांचा हा सण यावर्षी शुक्रवार, 18 मार्च 2022 रोजी साजरा केला जाईल. असं म्हणात की, हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. या दिवशी लोक जुन्या तक्रारी विसरून एकमेकांना रंग आणि गुलाल लावून सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही आपल्या मित्र-परिवारास होळीच्या मराठी Wishes, Messages, Greetings, Facebook, What's app Status द्वारे खास शुभेच्छा देऊन शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (वाचा - Happy Holi 2022 Wishes & HD Images: होळी निमित्त WhatsApp Stickers, Quotes, Colourful Wallpapers, SMS द्वारे मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा!)
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी संगे केरकचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा
सांस्कृतिक आणि पारंपारिक समजुतींमुळे होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. पुराण, दासकुमार चरित, संस्कृत नाटक, रत्नावली यांसारख्या भारतातील अनेक पवित्र पौराणिक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे.