Hindu Samrajya Diwas 2020: छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. म्हणून आजही हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केल्या जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांमध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिवस 'हिंदू साम्राज्य दिन' (Hindu Samrajya Diwas) म्हणून साजरा होतो. हिंदू साम्राज्य दिनी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा आठवून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
इ.स 1964 रोजी जेष्ठ शुल्क त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यामुळे या दिवसाला 'आनंदनाम संवत्' असे नाव देण्यात आले होते. रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज सम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. (वाचा - Shivrajyabhishek Din 2020 Messages: शिवराज्याभिषेक दिन निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा, Wishes, HD Images, Quotes च्या माध्यमातून शेअर करून शिवरायांना करा मानाचा मुजरा!)
शिवाजी महाराजांच्या काळात अत्याचारी मुघल शासकांमुळे अराजकता वाढली होती. याची झळ रयतेला मोठ्या प्रमाणात सोसावी लागत होती. आजही परिस्थिती वेगळी नाही अजूनही देशात काही आत्मकेंद्रित लोक फक्त स्वतःचाच विचार करतात. त्यामुळे जनतेला वारंवार नुकसान सहन करावे लागते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अशाच काही गोष्टी सातत्याने हिंदुस्थानात घडत गेल्या व त्यामुळे नुकसान मात्र जनतेचेचं झाले. शिवाजी महाराजांच्या काळात जनतेने त्यांची तळमळ जाणली आणि त्यांना साथ दिली. परिणामी शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे सुवर्णसिंहासन पाहण्याचा योग जुळून आला.
मुघल साम्राज्यात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती. देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता. मात्र, शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हिंदू स्वराज्याची स्थापना केली. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.