Hartalika Tritiya Wishes 2020: हरतालिका तृतीयेच्या मराठमोळ्या शुभेच्छा, WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा सण
Hartalika Tritiya Wishes (Photo Credits-File Image)

Hartalika Tritiya Wishes 2020: हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. तर पार्वती देवीने भगवान शंकर हे आपले पती व्हावेत म्हणून तिने हे व्रत केले होते. याच कारणास्तव सौभाग्यवतींपासून ते कुमारीका सुद्धा हरतालिका तृतीयेचे व्रत करतात. या दिवशी उमा-महेश्वर यांचे पूजन केले जात असून खास म्हणजे शिव-पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा एका विशिष्ठ पद्धतीची पूजा पार पाडली जाते. खरंतर हरतालिका तृतीयेचा उपवास हा आपल्याला हवा तसा आणि योग्य पती मिळण्यासाठी केला जातो असे म्हटले जाते. दक्षिण भारतात या व्रताला गौरी हब्बा नावाने संबोधले जाते.(Hartalika Teej 2020: हरतालिका तृतीयेचंं व्रत कसं आणि कधी कराल, जाणुन घ्या मुहुर्त आणि पूजाविधी)

हरतालिका तृतीयेच्या व्रताला हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी महादेव-पार्वतीसह गणेशाची सुद्धा पुजा केली जाते. काहीजण या दिवशी निर्जळ उपवास सुद्धा ठेवतात. त्याचसोबत रात्रभर नाच-गाणी करुन हरतालिका तृतीयेचा सण साजरा केला जातो. तर यंदाच्या हरतालिका तृतीयेच्या मराठमोळ्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा सण! (Hartalika Teej 2020 Special Mehndi Designs: हरितालिका तृतीयेनिमित्त या 5 ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स काढून करा शिव-पार्वती पूजन!)

>>माता उमाच्या भाळी

जसा शिवाचा पिंजर

उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनजोगता वर

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!  

Hartalika Tritiya Wishes (Photo Credits-File Image)

>>तिच्या मनी असे एक आशा

होऊ नये तिची निराशी

सर्व इच्छांची पूर्ती होवो

समृद्धी घेऊन आली हरतालिका

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Hartalika Tritiya Wishes (Photo Credits-File Image)

>>शिव व्हावे प्रसन्न

पार्वतीने द्यावे सौभाग्यदान!

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Hartalika Tritiya Wishes (Photo Credits-File Image)

>>हे शिव शंभो

अक्षय राहो सौभाग्य द्यावा देवा असा वर

या हरतालिका व्रताचे मिळो सुफळ सत्वर!

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

Hartalika Tritiya Wishes (Photo Credits-File Image)

तर  श्रावण सोमवार आणि महाशिवरात्री या दिवशी भगवान शंकराची पूजा करता आली नाही अशा महिलांनी हरतालिकेला पूजा केल्यास त्यांना बारा महिन्यांच्या उपासनेचे फळ प्राप्त होते अशी ही मान्यता आहे. हरितालिका व्रता च्या निमित्त्ताने संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करून दुसऱ्या दिवशी गणेशाच्या पुजनानंंतर उपवास सोडायचा असतो.