
Valentine's Day 2021 Messages: व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन आठवडा अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. पाश्चात्य देशात हा दिवस मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. याशिवाय भारतातदेखील प्रेमी युगल हा दिवस उत्सहात साजरा करतात. प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो. रोम राज्यातून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाइन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो.
व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी अनेकजणा आपल्या जोडीदाराला भेटवस्तू तसेच शुभेच्छा देत असतात. तुम्हीदेखील व्हॅलेंटाईन डे निमित्त WhatsApp Status, SMS, Greetings, Images, Wallpapers शेअर करून आपल्या जोडीदाराचा दिवस खास करू शकता. यासाठी तुम्हाला खालील मराठी मेसेज नक्की उपयोगात येतील.
या Valentines Day ला
मला गिफ्ट मध्ये,
तू आणि तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
व्हॅलेंटाईन डे च्या हार्दिक शुभेच्छा

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Valentine Day

प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी, वेड मात्र तुझेचं आहे.
व्हॅलेंटाईन डे च्या खूप खूप शुभेच्छा

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे,
आली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास
फक्त तुझा, हवा आहे...
व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
Happy Valentines Day!

रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घातली होती. प्रेम करणार्यांचाही त्याला राग येत असे. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह करून दिला. केलेडियस राजाला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाइनला तुरुंगात डांबलं. तुरुंगात असताना व्हॅलेंटाइनला जेलरच्या मुलीवर प्रेम झालं. मात्र, प्रेमाची शिक्षा म्हणून त्याला 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली. तेव्हापासून हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो.