Happy Valentines Day 2020 | File Image

Happy Valentine’s Day 2020 Marathi Wishes and Messages:  प्रेमात पडलेल्या तरूण जोडप्यांसाठी 14 फेब्रुवारीचा दिवस खास असतो. आज तुमच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला खूष करण्यासाठी तुम्ही गिफ्ट्स किंवा सरप्राईजची तयारी केली असेल पण या रोमॅन्टिक दिवसाची सुरूवात व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा (Valentine’s Day  Wishes) देऊन करायचा प्लॅन असेल तर व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकच्या माध्यमातून Valentine’s Day 2020 च्या शुभेच्छा देणार्‍या HD Images डाऊनलोड करून आजच्या दिवसाची सुरूवात करा अन आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणीत करा. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याची वेळीच कबुली देणं देखील गरजेचे आहे. मग आजचा प्रेमाचा दिवस त्यासाठीच स्पेशल आहे. मग तुमच्या आयुष्यात असणार्‍या 'त्या' खास व्यक्तीसमोर प्रेमाची कबुली देण्याचा आजचा दिवस दवडू नका. तसेच जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आज व्हेलेंटाईन डेचं औचित्य साधून आजचा दिवस तुमच्या साथीदारासोबता शेअर करा. पण त्यापूर्वी तुमच्या मनातील भावना डिजिटल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स डाऊनलोड करून शेअर करा नक्की. Happy Valentine’s Day 2020 Wishes: 'व्हॅलेंटाईन डे' च्या मराठमोळ्या शुभेच्छा, Greetings, Whatsapp Status, Facebook Messages देऊन रोमॅन्टिक अंदाजात सेलिब्रेट करा आजचा प्रेमाचा दिवस!

व्हॅलेंटाईन डे 2020 च्या शुभेच्छा

Happy Valentines Day 2020 | File Image
Happy Valentines Day 2020 | File Image
Happy Valentines Day 2020 | File Image
Happy Valentines Day 2020 | File Image
Happy Valentines Day 2020 | File Image

सम्राट क्लाऊडियसला निषेध करत संत व्हेलेंटाईन यांनी जोडप्यांचं लग्न लावलं. त्याच्या या कृत्यानिमित्त व्हेलेंटाईनला जेलमध्ये टाकण्यात आले आणि 14 फेब्रुवारी 270 साली त्याला फासावर लटकवण्यात आले. संत व्हेलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. त्यामुळे जगभरात या दिवसाचं खास आकर्षण असतं.