
Happy Teddy Day 2020 Wishes: जोडप्यांसाठी फेब्रुवारी महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या महिन्यातील व्हॅलेंटाइन वीकमधील विविध दिवसाचे वेगवेगळे महत्त्व असते. तसचं फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरूणांमध्ये 14 फेब्रुवारीची म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’ची उत्सुकता असते. या प्रेमाच्या सप्ताहातील चौथा दिवस म्हणजे ‘टेडी डे’.
यंदा 10 फेब्रुवारीला टेडी डे साजरा होणार आहे. 'टेडी डे' निमित्त तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला त्याच्यावर किती प्रेम करता हे सांगू इच्छित असाल तर तुम्हाला लेख नक्की उपयोगात येईल. तुम्ही मराठमोळ्या अंदाजातील खालील मॅसेजेस तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून तुमच्या प्रेमाची कबुली देऊ शकता. टेडी डे च्या निमित्त हे मराठी रोमँटिक शुभेच्छा Messages, Greetings, WhatsApp Status, GIFs, Images पाठवून तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनला सरप्राईज देऊ शकाल.
प्रेमात पडलो तुझ्या
तुला कळलचं नाही
मी अजूनही तिथेच आहे उभा
तू वळून पाहिलचं नाही!
'टेडी डे'च्या शुभेच्छा!!

मला तुझी आयुष्यभर साथ नकोय
तर तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस
तोपर्यंत आयुष्य हवंय...
'टेडी डे'च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली,
असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो,
तुझ्याकडून काहीच नको,
पण पुढच्या जन्मी मला प्रेम करायला
फक्त तू आणि तूच मिळो...
'टेडी डे'च्या खूप खूप शुभेच्छा !

तुझ्यासाठी जगत होतो,
तुझ्यासाठीच जगायचयं,
पण तुझ्यासाठी जगताना
तुला माझ्यासाठी जगताना पाहायचयं...
'टेडी डे'च्या खूप खूप शुभेच्छा!

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू...
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू...
काय सांगू माझ्यासाठी क्युट टेडी बियर आहेस तू...!
'टेडी डे'च्या शुभेच्छा !

येणाऱ्या प्रत्येक सावलीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी
उगीचच आस आहे...!
'टेडी डे'च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

‘टेडी डे’ हा दिवस जोडप्यांसाठी खूपचं खास असतो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला सुंदर टेडी गिफ्ट करून आपल्या प्रेमची जाणीव करून देतात. बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या व्यक्तीला तुम्ही टेडी देऊ शकता. ‘टेडी डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजणांना त्यांच्या आवडीच्या रंगाचे टेडी बीयर गिफ्ट करू शकता. तसेच त्याला वरील मराठी संदेश पाठवून आपलं प्रेम व्यक्त करू शकता.