
Happy Teddy Day 2020 Images: फेब्रुवारी महिना हा प्रत्येक जोडप्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. या महिन्यात येणारे विविध दिवस म्हणजे या जोडप्यांसाठी एक प्रकारची परवणीच असते. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरूणांमध्ये 14 फेब्रुवारीची म्हणजेच 'व्हॅलेंटाइन डे'ची उत्सुकता असते. या प्रेमाच्या सप्ताहातील चौथा दिवस म्हणजे 'टेडी डे'. या दिवशी टेडी किंवा भेटवस्तू एकमेकांना दिल्या जातात.
या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणींनी दिलेली वस्तू आयुष्यभर आठवणीत राहणारी असते. त्यामुळे या दिवशी अनेक जोडपे आपल्या जोडीदाराला टेडी गिफ्ट म्हणून देत असतात. तसेच 'टेडी डे' च्या दिवशी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. तुम्हालाही तुमच्या मित्र-मैत्रिणींना 'टेडी डे' निमित्त HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन खास शुभेच्छा द्यायच्या असतील तर खालील HD फोटो तुमच्या नक्की उपयोगात येतील.





'टेडी डे' हा दिवस जोडप्यांसाठी खूपचं खास असतो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला सुंदर टेडी गिफ्ट करून आपल्या प्रेमची जाणीव करून देतात. बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या व्यक्तीला तुम्ही टेडी देऊ शकता. आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी बीयर देण्यामागचे कारण म्हणजे ‘मी कायम तुझ्यासोबत आहे’ हा संदेश तिला/त्याला देणं. 'टेडी डे' च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या प्रियजणांना त्यांच्या आवडीच्या रंगाचे टेडी बीयर गिफ्ट करू शकता.