Happy Republic Day Marathi Wishes: 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे हा दिवस तमाम भारतीयांसाठी फार महत्त्वाचा असतो. या दिवशी नवी दिल्लीत भव्य परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारत आपली ताकद दाखवतो. संचलनाच्या माध्यमातून ते आपल्या भारतातील विविधतेतून एकता कशी कायम आहे याचे अद्भूत प्रदर्शन 'याचि देही याचि डोळा' अनुभवायला मिळते. अशा या ऐतिहासिक दिनाचे महत्व आपल्या आप्तलगांना पटवून देण्यासाठी आपण मेसेजेस च्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो.
विविधतेतून नटलेल्या आपल्या भारताची शानच काही और आहे ज्याची तुलना कशाचीही होऊ शकत नाही. विविध रंगाचे, विविध भाषाचे, विविध धर्माचे लोक येथे पाहायला मिळतात. धर्म जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या मनातील भावना एकच असली पाहिजे ती म्हणजे भारतभूमीची सदैव रक्षण करणे.
प्रजासत्ताक दिनाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा:
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी
हिंदू, मुस्लिम शीख नि ख्रिस्ती सारे एकच आम्ही
सारे एकच आम्ही सारे सारे एकच आम्ही
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
उत्सव तीन रंगांचा सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी भारत देश घडविला
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
उंचच उंच फडकत राहो तिरंगा अपुला
कधीही फिका न पडो रंग त्यातला
सर्वांनी मिळून राखूया त्याचा मान
सदैव राहो या तिरंग्याची शान
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणा-या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा
GIFs Images:
हे शुभेच्छा देण्यापुरता किंवा खास त्या दिवसापुरता न दाखवता तुमचे देशप्रेम तुमच्या कृतीतून दिसून द्या. तुमच्या चांगल्या कृतीतून आपल्या देशाची शान कायम राहील. सर्व भारतीयांना लेटेस्टली मराठीकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप सा-या शुभेच्छा