 
                                                                 Happy Ram Navami 2021: हिंदू धर्मग्रंथांवर आधारित चैत्र शुद्ध नवमीला दरवर्षी राम नवमीचा सण साजरा केला जातो. यावर्षी श्रीराम नवमीचा उत्सव 21 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाईल. श्री राम नवमी हा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे. हा उत्सव भगवान श्री राम यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणून रामनवमीच्या दिवशी प्रत्येक घरात भगवान श्री राम यांची विशेष प्रार्थना आणि पूजा केली जाते.
तुम्ही राम नवमी निमित्त मराठमोळे Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून रामभक्तांना खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेजस नक्की उपयोगात येतील (वाचा - Rama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व)
ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 
 श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज
आणि भरताचे त्याग
आपल्या सगळ्यांना
आयुष्यात शिकवण देत राहो.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
 चैत्र नवरात्रातील नवमी तिथी राम नवमी म्हणूनही साजरे केली जाते. कारण धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पृथ्वीवर भगवान विष्णूचा म्हणजेचं भगवान रामाचा जन्म झाला होता. हा दिवस रामभक्त मोठ्या उत्सहात साजरा करतात.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
