Happy Parents Day 2021 Wishes: पालक दिनाच्या शुभेच्छा, Quotes, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत आई-वडिलांसह परिवाराचा दिवस करा खास
Happy Parents Day 2021 Wishes। File Images

Parents Day 2021 Wishes In Marathi:  भारतीय संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती फार मोठा वाटा उचलते. ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये आज अनेक बदल झाले आणि हळूहळू एकत्र कुटुंब पद्धती विरळ होत चालली आहे. भारतामध्ये हीच तुमच्या कुटुंबाची, त्यांच्या प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी नॅशनल पेरेंट्स डे (National Parents Day ) म्हणजेच पालक दिन साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक वर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा करण्याची पद्धत आहे. यंदा हा पॅरेंट्स डे किंवा पालक दिन 25 जुलै दिवशी साजरा केला जाणार आहे. आज आपले पालक कुठे आहेत हे फार महत्त्वाचं नाही पण या दिवसाने आपल्याला त्यांचं आपल्यासोबत असनं सेलिब्रेट करण्याचा एक दिवस आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यातील त्याचं महत्त्व जाणून त्यांच्याप्रति कृतज्ञता, आदर आणि धन्यवाद म्हणण्यासाठी Facebook, Twitter, Instagram, Telegram यांच्यामाध्यमातून National Parents' Day च्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग़्स, Wishes, Messages, GIFs, HD Images नक्की शेअर करा. नक्की वाचा: Happy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल!

मुलांना, पाल्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, स्वावलंबी करण्यासाठी, संस्कारक्षम करण्यासाठी घरातील वातावरण, पालकांचा वावर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. घरात आजी-आजोब आणि नातवंडांचं नातं, चुलत भावा बहिणीचं नातं, आई-वडीलांसोबत मुलांचं नातं हे वयाच्या विविध टप्प्यात बहरत जात असतं. त्यामधूनच समाजशील माणूस घडत असतो त्यामुळे कुटुंब ही आपल्या संस्कृतीची खास ओळख आहे. आजच्या दिवशी त्या प्रत्येक घराच्या आधारस्तंभाचे आभार मानायला विसरू नका.

पालक दिनाच्या शुभेच्छा

Happy Parents Day 2021 Wishes। File Images

पालक दिनाच्या सार्‍यांना हार्दिक शुभेच्छा

Happy Parents Day 2021 Wishes। File Images

आईची ती प्रेमळ माया,

बाबांची ती वटवृक्षाची छाया

देवाने घडविली

ही अजब किमया

पालक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Happy Parents Day 2021 Wishes। File Images

वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसं बदलतात

पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही

कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.

सर्वांना पालक दिनाच्या शुभेच्छा!

Happy Parents Day 2021 Wishes। File Images

आई विना घर रिकामं वाटतं

बापाविना आयुष्य

म्हणूनच तुमच्या आयुष्यातील

या दोन व्यक्तींना कायम जपा!

पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आज घडाळ्या काट्यासोबत धावणार्‍या आपल्या सार्‍यांनाच स्वतःचं स्वतंत्र जग असतं. पण मागील दीड वर्षात लॉकडाऊन आणि कोरोना संकटामुळे अनेकांना आपल्या माणसांची, माणूसकीची, कुटुंबाची खरी गरज समजली आहे. या निमित्ताने अनेक घरात सारी मंडळी 24 तास एकमेकांसोबत राहिल्याने अनेकांना एकमेकांची नव्याने ओळख झाली असेल मग तुमच्यामध्ये निर्माण झालेला हा नवा बॉन्ड असाच वृद्धिंगत ठेवा. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!