
Happy Nag Panchami 2021 Images: हिंदू पंचागात सण, उत्सवांना प्रचंड महत्व दिले जाते. अशा महत्त्वाच्या सणापैकीच एक म्हणजे नाग पंचमी (Nag Panchami 2021). श्रावण महिन्यात येणारा हा सण यंदा 13 ऑगस्ट 2021 (इंग्रजी कॅलेंडरनुसार) येतो आहे. या सणादिवशी म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. नागपंचमी (Nag Panchami) सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जातात. नागपंचमी सणानिमित्त एकमेकांना Wallpapers, Messages, WhatsApp Status, Quotes द्वारा शुभेच्छा देण्यासाठी इथे एचडी इमेजेस इथे देत आहोत. ज्या डाऊनलोड करुन आपण एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. पूर्वी खऱ्या नागाची पूजा केली जायची. अलिकडे मात्र कायद्याने यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागाची प्रतिकृती करुन पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णाने कालीया नागाचे दमन करुन विजयी होऊन तो डोहातून वर आला म्हणून या दिवशी नागाची पूजा केली जाते, अशी अख्यायीका आहे.
सुरुवातीला नाग हे द्रविडीयन लोकांचे दैवत होते. मात्र, पुढे आर्य आणि द्रविड असा दोन्ही नागरिकांकडून नागपूजा केली जाऊ लागली. अशीही अख्यायिका आहे की, मानवी प्रजातीला त्रास देणाऱ्या प्रजातींमध्ये जेवढे काही प्राणी, जीव आहेत त्यात नागाचाही समावेश आहे. त्यामुळे त्याच्या त्रासापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्याची पूजा केली जाते. नागाजी पूजा ज्या दिवशी केली जाते तो दिवस म्हणजेच नाग पंचमी होय.


प्रामुख्याने नागपंचमी हा सण महिलांचा समजला जातो. या दिवशी महिला आपल्या घरात नागाची प्रतिकृती किंवा प्रतिमा लावून पूजा करतात. ग्रामिण भागात नागपंचमिच्या दिवशी वारुळ पूजले जाते. पूर्वी गारुडी लोक खरोखरचे नाग घेऊनही फिरत असत. परंतू, अता त्यावर कायद्याने बंदी आहे. या दिवशी नागाला दूध, लाह्या वाहून त्याची पुजा केली जाते. खरे म्हणजे नाग हा मांसाहारी प्राणी आहे. त्यामुळे तो लाह्या वैगेरे असे पदार्थ खात नाही. परंतू, तहीही ते वाहिले जातात.


नागपंचमिच्या दिवशी महिला, मुली गाणी गातात, खेळ खेळतात. सासुरवाशी सुना माहेरी येतात. अविवाहीत मुलीही हा दिवस आनंदाने साजरा करतात. घराघरांमध्ये पूरण पोळी, गोडधोड बनवले जाते. झोपाळे बांधून झोके घेणे, गाणी गाणे, फेर धरणे, विविध खेळ खेळणे अशा पद्धतीने महिला हा दिवस आनंदाने साजरा करतात.