
Happy Labour Day 2023 Images: जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी कामगारांच्या कर्तृत्वाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन म्हणून पाळला जातो. कामगार दिन हा दिवस कामगार वर्गासाठी महत्वाचा दिवस आहे. 1 मे हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. कामगारांच्या प्रयत्नांची आणि परिश्रमाची कबुली देणारा कामगार संघटनेच्या चळवळीतला विशेष दिवस म्हणजे कामगार दिन हा आहे. कामगार दिन हा दिवस समाजासाठी आणि कामगारांचे योगदान आणि बलिदान साजरा करतो. भारतात कामगार दिन पहिल्यांदा 1923 मध्ये साजरा करण्यात आला होता. या दिवशी खास मराठी Images, HD Wallpaper, WhatsApp, Facebook Status, Messages, Wishes शेअर करून कामगार बंधूंना खास शुभेच्छा देऊ या.
पाहा, खास शुभेच्छा संदेश





कामगार दिनाची सुरुवात कामगार संघटनेने केलेल्या चळवळी नंतर झाली होती. 1 मे 1886 रोजी सुरू झालेल्या आणि चार दिवसांनंतर हेमार्केट प्रकरणाचा पराकाष्ठा झालेल्या यूएसमधील सामान्य संपाच्या स्मरणार्थ अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरने कामगार दिन म्हणून 1 मे ही तारीख निवडली आणि तेव्हा पासून 1 मे हा दिवस कामगार दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.