हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीच्या दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. सांगितले जाते की याच दिवशी रोहिणी नक्षत्रावर मथुरा येथे श्रीकृष्ण जन्माला आला. या दिवशी कृष्ण जन्म झाला म्हणून या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) किंवा गोकुळाष्टमी (Gokulashtami) म्हटले जाते. काही लोक या दिवसाला कृष्ण जन्मदिवस असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट या दिवशी हा उत्सव साजरा होत आहे. संपूर्ण भारत आणि जगभरातील अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होतो. अनेक लोक या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणासही आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण इथे दिलेले व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून काही HD Images, Wallpapers, Photos वापरु शकता.
गोकुळाष्टमी दिवशी रात्री बारा वाजलेपासून उपवास धरतात. आदल्या रात्री धरलेला हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे श्री कृष्णाच्या जन्मवेळेला सोडण्याचा प्रघात आहे. या दिवशी गोपाळकाला आणि इतर काही पदार्थ खाऊन हा उपवास सोडतात. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका आणि पुरी या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि धुमधडाक्यात पार पडतो. (हेही वाचा, Happy Krishna Janmashtami 2020 Messages: श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या मराठी शुभेच्छा, Wishes, Whatsapp Status वर शेअर करुन साजरा करा कृष्ण जन्मोत्सव)
भारतात आणि हिंदू धर्मांमध्ये सणांची काहीच कम नसते. प्रत्येक महिण्याला कोणता ना कोणता सण असतोच. त्यामुळे एकत्र येणे एकमेकांचा आनंद वाटून घेणे हे ओघानेच येते. मात्र गेली सहा महिणे राज्यावर आणि देशावर कोरोना व्हायरस संसर्गाचे संकट आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. अशा स्थिती सण उत्सव साजरे करण्यावरही मर्यादा येत आहेत. परिणामी सर्वच सण उत्सव व्यक्तिगत पातळीवर किंवा घरीच साजरे करण्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. अशा स्थिती यंदाच्या गोकुळाष्टमी सणावरही कोरोना व्हायरस संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे हा सणही घरच्या घरीच साजरा करणे केव्हाही इष्ट.