गुढी पाडवा (Gudi Padwa 2022) म्हणजे हिंदू पंचांगानुसार नववर्षाची सुरुवात. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे संबंध वर्षभरात येणाऱ्या मुहूर्तामध्ये गुढी पाडव्याला अत्यंत महत्त्व आहे. शालनिवाहन संवस्तराचा पहिला दिवस म्हणजेच गुढी पाडवा. चैत्र शुद्ध प्रदिपदला हा सण साजरा केला जातो. गुढी पाडवा सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या धावपळीच्या युगात आपले अप्तेष्ट अनेक ठिकाणी विखूरलेले असतात. वेगवेगळी गावे, शहरे आणि जगभरातील विविध देशांमध्ये ते हा सण साजरा करत असतात. अशा वेळी आपण आपले मित्र, आप्तेष्ट आणि नातेवाईकांना देऊ इच्छित असाल तर त्यासाठी खास Gudi Padwa 2022 WhatsApp, Facebook Status, Messages HD Images इथे देत आहोत. इथे दिलेल्या Gudi Padwa 2022 HD Images वापरुन तुम्ही अनेकांना शुभेच्छा देऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे इथल्या इमेज पूर्णपणे मोफत आहेत.
मराठी नववर्षाची सुरुवातही गुढी पाढव्यापासूनच होते. असा हा गुढी पाढवा यंदा 2 एप्रिल या दिवशी आलाआहे. याच दिवसापासून नवरात्रोत्सव पर्वही सुरु होत आहे.
गुढी पाडवा हा सण महाराष्ट्र आणि गोवा, केरळ या राज्यांमध्येही साजरा होतो. या राज्यांमध्ये हा गुढी पाडवा हा 'संवत्सर पाडवो' नावाने साजरा केला जातो. काश्मीर राज्यात नवरेह, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा, कर्नाटकमध्ये हाच पाडवा युगाडी पर्व नावाने ओळखतात तर आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांमध्ये हा दिवस उगाडी, अशा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो.