Happy Doctor's Day 2020 Messages: राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन कोविड योद्धांना म्हणा Thank You!
National Doctors Day Messages (Photo Credits: File)

National Doctor's Day Marathi Messages: 'रुग्णसेवा हिच खरी देशसेवा' असे अखंड व्रत हाती घेऊन रुग्णांच्या स्वास्थ्यासाठी अविरत झटणा-या देशभरातील तमाम डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै हा दिवस 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' (National Doctor's Day) साजरा केला जातो. सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस सारख्या महाभयाण विषाणूच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे यातून आपल्या देशवासियांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी दिवसरात्र एक करुन झटणा-या माणसातील या देवाला आज सारा देश 'कोविड योद्धा' (COVID Warriors) म्हणून संबोधू लागला आहे. अशा या कोविड योद्धांचे तुम्ही मोबाईल किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवून आभार मानू शकता.

सध्याच्या बिकट परिस्थिती आपला जीव धोक्यात घालून आपल्या रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी झटणा-या या कोविड योद्धांना मराठमोळ्या शुभेच्छा संदेशाच्या माध्यमातून आभार व्यक्त करु शकता.

रुग्णसेवेचे ज्यांनी अखंड व्रत हाती घेतले

असे डॉक्टरांच्या रूपातील देव आम्हास भेटले

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

National Doctors Day Messages (Photo Credits: File)

आपल्या कर्तव्याची जाण ठेवून

रात्रंदिवस करतात रुग्णसेवा

अशा या कर्तव्यनिष्ठ डॉक्टरांचा

सा-या जगालाच वाटतो हेवा

डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

National Doctors Day Messages (Photo Credits: File)

स्वत:चा जीव धोक्यात घालून आपल्या रुग्णाला

कोरोना व्हायरसपासून वाचविण्यासाठी घराबाहेर पडलेल्या

या माणसातील देवाला सलाम

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

National Doctors Day Messages (Photo Credits: File)

कोरोनावर मात करण्यासाठी भूक, तहान विसरून

जे प्रसंगी धोक्यात घालतायतय आपला जीव सुद्धा

अशा या डॉक्टरांना सा-या देशानेही संबोधले 'कोविड योद्धा'

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

National Doctors Day Messages (Photo Credits: File)

रुग्णांना बरे करणे हा एकच ध्यास

अशा डॉक्टरांसाठी सर्वांनी मिळून

आजचा दिवस करूया खास

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

National Doctors Day Messages (Photo Credits: File)

जे डॉक्टर आपल्या रुग्णांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वत:च्या कुटूंबापासून दूर राहतात आणि आपले कर्तव्य तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात अशा कोविड योद्धांना राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त लेटेस्टली मराठीचा सलाम!