Happy Diwali 2021 Greetings for Family: दिन दिन दिवाळी गाई-म्हशी ओवाळी….असा हा दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळी किंवा दीपावली होय. जो संपूर्ण भारतात धूमधडाक्यात साजरा केला जातो. एवढंच नाहीतर भारताबाहेरही आता दिवाळी साजरी करण्यात येऊ लागली आहे. दिवाळीचे पाच दिवस म्हणजेच धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी), लक्ष्मी पूजन (बडी दिवाळी), दिवाळी पाडवा, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. कार्तिक महिन्यात येणारा हा पाच दिवसांचा दिव्यांचा उत्सव आहे.
जरी दिवाळी हा मुख्यतः हिंदू उत्सव असला तरी, हा दिवस इतर समुदायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केली जाते. दिवाळी हा सण संपूर्ण जगभरात "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय" म्हणून ओळखला जातो. तर दीपावली निमित्त WhatsApp Messages, Facebook Quotes, Images, HD Wallpapers, SMS पाठवून साजरा करा दीपोत्सव. (Diwali Faral & Sweet Recipes: दिवाळी निमित्त घरच्या घरी पदर सुटलेल्या करंज्या ते खुसखुशीत चिवडा असे फराळाचे पदार्थ असे बनवाल?)