Diwali 2020 Messages in Marathi: हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे 'दिवाळी.' 4-5 दिवसांच्या या सणात सर्वत्र उत्साही वातावरण असते.वसुबारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज या दिवाळीतील प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. आकाशकंदील, दिव्यांची आरास, रंगीबेरंगी रांगोळ्या, विद्युत रोषणाई यामुळे आपल्या घरासह संपूर्ण परिसर प्रकाशमय होतो. फराळ, गोडाधोडाचे पदार्थ यांची रेलचल असते. फटाक्यांची आतिषबाजी असते. तर नवे कपडे, सजण्यानटण्याची हौसही भागवून घेता येते. घर सजवण्याचा उत्साही असतो. तसंच नातेवाई, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या भेटीगाठीने वातावरणात अधिक गोडवा निर्माण होतो. मात्र यंदा कोविड-19 च्या सावटामुळे दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी करावी लागणार आहे. परंतु, होळी पासूनचे या वर्षभरातील अनेक सण आपण व्हर्च्युअली साजरे केले आहेत. त्यामुळे आता डिजिटल माध्यमांशी आपली अधिकच ओळख झाली आहे. दिवाळीच्या शुभेच्छाही तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram), व्हॉट्सअॅप (WhatsApp) यावरु देऊ शकता. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत दिवाळीचे खास मराठमोळे शुभेच्छा संदेश, ग्रीटिंग्स, SMS, Messages, GIFs, Images आणि शुभेच्छापत्रं!
लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दिवाळीचा उत्साह असतो. नवविवाहित दांपत्यासाठी तर पहिला दिवाळसण खास असतो. पहिल्या दिवाळसणानिमित्त नवे कपडे, गिफ्ट याची मौज असते. त्याचबरोबर नवीन वस्तू, सोन खरेदीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. एकंदर सगळीकडे आनंदी आनंद असतो.
दिवाळी 2020 शुभेच्छा!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
नवा गंध, नवा वास
नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट
शुभ दीपावली!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ, समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज
अशा या दीपावलीच्या सोनेरी शुभेच्छा!
GIF's
अंधार चिरुन नव चैतन्य, नवा प्रकाश दाखवणारा असा हा दिव्यांचा सण. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले कोरोनाचे सावट दूर होऊन सारं काही प्रकाशमय होऊ दे, हीच या दिवाळी निमित्त प्रार्थना करुया आणि यंदाची दिवाळी साध्या पद्धतीने परंतु अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करुया. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठीकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!