
Happy Children's Day 2019 Marathi Wishes: असं म्हणतात ज्या गोष्टीचा पाया भक्कम असतो त्याचे अस्तित्व चिरकाल टिकण्यास मदत होते.या न्यायाने बालपण ही आयुष्याची बांधणी भक्कम करणारी पहिली पायरी असते. पुढे येणाऱ्या स्पर्धा, चिंता, या साऱ्यांच्या आधी काही क्षण आनंदात घालवण्याचा हा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात खास असतो, काळाच्या ओघात मोठे होताना मात्र या बालपणातल्या अनेक गोष्टी मागे सरतात. या हरवलेल्या बालपणाचा पुन्हा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा केला जातो.बालदिनाच्या (Children's Day) निमित्ताने आपल्या बालमित्रांना भेटून, गप्पा मारून त्यांच्यासोबत हा दिवस घालवण्याची मजा काही औरच असते पण व्यस्थ शेड्युलमुळे जर का तुम्हाला मित्रांची भेट घेणे शक्य होणार नसेल तर निदान सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत तरी तुम्ही मित्रांशी संवाद साधायला हवा. यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागू नये याची सुद्धा सोय आम्ही केलेली आहे, बालदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी ही काही खास मराठी शुभेच्छापत्रे Messages, Greetings, SMS, GIFs, Images, तुम्हाला WhatsApp Status किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करता येतील.
अलीकडे सोशल मीडियाच्या जगात ऑनलाईन शुभेच्छा दिल्याशिवाय कोणतेही सेलिब्रेशन पूर्ण होतच नाही त्यामुळे हे काही पर्याय तुम्हाला तुमच्या सदिच्छा पोहचवण्यासाठी मदत करतील. हे भाषेतील कस्टमाईझ्ड मॅसेज तुम्ही फ्री डाउनलोड करून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता.





GIFs
जागतिक स्तरावर बालदिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून 20 नोव्हेंबर या दिवसाची निवड करण्यात आली होती मात्र भारतात, माजी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिन साजरा केला जातो.