
आज, 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती (Pandit Jawaharlal Nehru Birth Anniversary) निमित्त देशभरात बालदिन साजरा केला जात आहे. पंडित नेहरूंचे लहान मुलांवरील प्रेम पाहता त्यांच्या मृत्यूपश्चात 1964 रोजी हा दिवस बालदिन म्ह्णून घोषित करण्यात आला. काळाच्या आणि कामाच्या ओघात मागे सरलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत या दिवशी सेलिब्रेशन केले जाते. अलीकडे कुठल्याही खास दिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याला विशेष महत्व आहे.. मात्र यासाठी मोठेमोठे मॅसेज शोधताना दमछाक होते हे ही तितकेच खरे आहे. पण काळजी करू नका बालदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना तुमचा शोधाशोधीचा त्रास वाचवण्याच्या हेतूने आम्ही काही फ्री टू डाउनलोड आणि रेडिमेड शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. या खास मराठी Greetings, Wallpapers, WhatsApp Stickers च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांना, त्यांच्या मुलांना, तुमच्या ओळखीतील लहानग्यांना तसेच सोशल मीडियावरील परिवाराला शुभेच्छा देऊ शकता.
अलीकडे मोठमोठे मॅसेज पाठ्वण्यापेक्षा थोडक्यात मुद्दा मांडल्यास लोकांना अधिक आवडते. यामुळे वाचणाऱ्याचा वेळ वाचवत तुमच्या सदिच्छा मात्र हव्या तश्या पोहचवता येतात. ही बाब लक्षात घेऊन आम्ही हे संदेश अगदी मोजक्या शब्दात पण क्रिएटिव्ह रूपात तयार केले आहेत.
बालदिनाच्या शुभेच्छा





जागतिक स्तरावर बालदिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून 20 नोव्हेंबर या दिवसाची निवड करण्यात आली होती मात्र भारतात, माजी दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालदिन साजरा केला जातो.