
मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मी व्रत (Mahalaxmi Vrat) करण्याची रीत आहे. आजही घराघरात सवाष्ण महिला महालक्ष्मीचं व्रत करून महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी त्याचं उद्यापन करतात. शेवटच्या गुरूवारी महिला आणि मुली एकत्र येऊन संध्याकाळी हळदी कुंकवाचा देखील कार्यक्रम करतात. या निमित्ताने घरी आलेल्या महिलांना लक्ष्मीच्या रूपात हळदी कुंकवासोबत एखादं वाण दिलं जातं. महिला सण समारंभाच्या निमित्ताने एकत्र आल्या म्हणजे उखाणांचा हट्ट हा होतोच. मग आज संध्याकाळी तुम्ही देखील मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरूवारच्या निमित्ताने एकत्र जमणार असाल तर पहा तुमच्या सख्यांनी आयत्या वेळेस केलेला उखाणांचा हट्ट कसा पुरवाल?
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हमखास उखाणे घेण्यासाठी हट्ट केला जातो. त्यासाठी हे उखाणे लक्षात ठेवा आणि आजच्या दिवसाचा आनंद साजरा करा. हे देखील नक्की वाचा: Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat Katha: मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रताची कथा नेमकी काय? इथे वाचा.
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी उखाणे
जीवन म्हणजे सुख-दु:खांचा खेळ
... रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची झाली वेळ
गुलाबाचं फूल दिसायला ताजं
... चं नाव घ्यायला मिळतंय सौभाग्य माझे
कपाळाचं कुंकू जसा चांदण्याचा ठसा
.... चं नाव घेते सार्याजणी बसा
गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी
... चं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या वेळी
यंदा महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात 24 नोव्हेंबर दिवशी झाली आहे. तर शेवटचा गुरूवार 22 डिसेंबर दिवशी आहे. पण या दिवशी संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी अमावस्या सुरू होत असल्याने अनेक जणी महालक्ष्मी व्रताची सांग़ता आज 15 डिसेंबर दिवशी करणार आहेत.