Haldi Kunku Rangoli Designs: हळदी कुंकू कार्यक्रमा दिवशी पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आकर्षक आणि सोप्या रांगोळ्या!
Haldi Kunku Rangoli Designs (PC- You Tube)

Haldi Kunku Rangoli Designs: हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला विशेष महत्त्व आहे. रांगोळी ही सामान्यतः सणवार, पूजा, लग्न आणि सर्व शुभकार्यांना आवर्जून काढली जाते. अंगणात रांगोळी काढणं हे शुभ मानलं जातं. रांगोळी काढण्यामागचा प्रमुख उद्देश्य म्हणजे अंगणाचे सुशोभीकरण होय. रांगोळी ही धार्मिक आणि सांस्कृतिकतेचे प्रतीक मानली जाते. प्रत्येक यज्ञाच्या किंवा पूजेच्या ठिकाणी आवर्जून रांगोळी काढली जाते. आजही महिला आपल्या अंगणात रांगोळी काढतात. महाराष्ट्रात प्रत्येक सणाला मोठी आणि आकर्षक रांगोळी काढण्याची प्रथा आहे. 15 जानेवारीला राज्यभर मकर संक्रांतीचा सण साजरा झाला.

मकर संक्रांतीचा सण विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जातो. सर्व महिला या दिवशी मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात. तसेच मकर संक्रांत पार पडल्यानंतर एकमेकींना आपल्या घरी हळदी-कुंकवाला बोलावतात. हळदी कुंकवाचा दिवस म्हणजे महिलांसाठी एक प्रकारे परवणीचं असते. या दिवशी महिला साज-शृंगार करून एकमेकींच्या घरी जातात. अलिकडे या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी महिला एकमेकींना घरात लागणारी एखादी वस्तू वाण म्हणून देतात. तुम्हीही तुमच्या घरी हळदी कूंकवाच्या कार्यक्रमाचे नियोजन करत असाल, तर आपल्या घराच्या अंगणात आकर्षक रांगोळी काढा. तुमची रांगोळी पाहून तुमच्या मैत्रिणी तुमचं नक्की कौतुक करतील. (वाचा - Haldi Kunku Special Ukhane: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये हे मराठी उखाणे नक्की मदत करतील नाव घेण्याचा गोड हट्ट पूर्ण करायला!)

सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी कुंकवाचा समारंभ साजरा करतात. यामध्ये एक महिला आपल्या घरी हळदी कुंकू समारंभ आयोजित करते. या कार्यक्रमाला ती आपल्या सुवासिन मैत्रिणींना घरी बोलावते. विवाहित महिला या दिवशी एकमेकींना हळद-कुंकू लावतात. तसेच अनेक ठिकाणी हळदी-कुंकवासाठी आलेल्या महिलांची ओटी भरण्याचीही प्रथा आहे.