
Guru Ravidas Jayanti 2024 Quotes: भारताला संतांची भूमी म्हटले जाते आणि देशातील महान संतांमध्ये गणले जाणारे गुरु रविदास हे महान संत, तत्त्वज्ञ, कवी, समाजसुधारक आणि ईश्वराचे अनुयायी म्हणून ओळखले जातात. आज 24 फेब्रुवारी 2024 रोजी गुरु रविदासजींची जयंती साजरी होत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांचा जन्म काशीमध्ये म्हणजेच वाराणसी येथे माघ महिन्याच्या पौर्णिमेला झाला. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की त्यांचा जन्म 1398 मध्ये झाला होता. संत रविदासांच्या जयंतीनिमित्त देशाच्या विविध भागात कीर्तनासह मिरवणुका काढल्या जातात, ज्यामध्ये गाणी, संगीत आणि दोहे गायले जातात. या दिवशी वाराणसीच्या सीर गोवर्धनपूर येथील त्यांच्या जन्मस्थानी मंदिरात एक वेगळेच वैभव पाहायला मिळते.
पाहा खास शुभेच्छा संदेश:





गुरू रविदासांनी समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यता आणि जातिवाद यांसारख्या वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवला होता. माणसाने नाही तर देवाने माणसाला निर्माण केले आहे आणि देवाने प्रत्येक मानवाला समान अधिकार दिलेला आहे हाच संदेश त्यांनी दिला. संत रविदासांचे विचारही त्यांच्यासारखेच थोर होते. अशा परिस्थितीत संत रविदासांच्या जयंतीनिमित्त या परोपकारी संताच्या अमूल्य विचारांपासून प्रेरणा घेऊ शकता.