Guru Nanak Jayanti 2022 Messages: शीख धर्माचे पहिले गुरू, गुरु नानक देव यांची जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी गुरु नानक देव यांची जयंती साजरी होत आहे. गुरु नानक देवजी यांचा जन्म कार्तिक पौर्णिमेला श्री नानकाना साहिब, पाकिस्तान येथे झाला. गुरु नानक देव यांची जयंती गुरु पर्व आणि प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. गुरुपर्वात सर्व गुरुद्वारांमध्ये भजन, कीर्तन आयोजित केले जातात आणि प्रभातफेरीही काढली जाते.
पहिले शीख गुरु नानक यांचा जन्म 1469 मध्ये पंजाब प्रांतातील तलवंडी येथे झाला. ही जागा आता पाकिस्तानात आहे. गुरु नानक देवजींना शीख धर्माचे पहिले गुरु मानले जाते. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा संदेश देखील पाठवतात. तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियाद्वारे Wishes, SMS, Quotes, Images द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Kartik Purnima 2022: उद्या आहे कार्तिक पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजाविधी)
शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी
त्यांना विनम्र अभिवादन...
तमाम शिख बंधु-भगिनींना
गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा!
एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दिव्यांचा सण तुमचे जीवन प्रकाशाने भरू दे
तुमच्या कुटुंबाची सर्व दुःखे दूर होवोत
गुरु नानक जयंती आणि प्रकाश पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रत्येक मनुष्याने प्रथम स्वतःच्या वाईट
आणि चुकीच्या सवयींवर विजय
मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
गुरू नानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!
पैसा कधीही हृदयाशी जोडून ठेवू नये,
त्याची जागा नेहमी खिशात असावी.
तरचं तुम्ही लोभ आणि अहंकारापासून दूर राहू शकाल.
गुरू नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु नानक जयंती गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. शीख धर्मातील हा सर्वात महत्वाचा सण आहे. गुरुनानक जयंतीच्या दिवशी गुरुद्वारांमध्ये कीर्तन दरबार सजतो. सकाळी वाहे गुरुजींच्या नावाचा जयघोष करत प्रभातफेरी काढली जाते. तसेच गुरुद्वारांमध्ये भाविकांसाठी लंगरचे आयोजन केले जाते.