India Republic Day 2021, Google Doodle: भारतीय प्रजासत्ताक दिन निमित्त खास गूगल डूडल
India Republic Day 2021, Google Doodle | (Photo Credits: Google)

Google Doodle on 72nd Republic Day: देशभरात आज 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देश जल्लोष साजरा करत आहे. अशा वेळी सर्च इंजिन गूगलनेही डूडल (epublic Day Google Doodle) साकारुन भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळचेही गूगल डूडल (Google Doodle) नेहमीप्रमाणेच खास आहे. यात अत्यंत वैशिष्ट्यापूर्णरित्या भारतीय संस्कृत आणि विविधतेत एकतेची झलक पाहायला मिळते. 26 जानेवारी (२६ January) हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) म्हणून साजरा करण्यात येतो. गूगलच्या होमपेजवर क्लिक करताच पाहणाऱ्या भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीबाबत विशेष गोष्टी पाहायला मिळतात.

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथील इंडिया गेट येथे आज भव्य संचलन आयोजित केले जाते. यात देशाच्या लष्कराची तिन्ही दलं सहभागी होतात. ज्यात भूदल, नौदल आणि हवाईदलाचा समावेश आहे. या संचलनावेळी देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले चित्ररथही सहभागी होतात.

प्रत्येक वर्षी 26 जानेवारी या दिवशी भारत आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची स्वतंत्र राज्यघटना अस्तित्वात आली. भारत सार्वभौम झाला. तेव्हापासून भारत देश हा राज्यघटनेनुसार चालतो. हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. (हेही वाचा, Happy Republic Day HD Images 2021: प्रजासत्ताक दिन शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wishes, Quotes, Greetings, WhatsApp, SMS, Facebook Message; साजरा करा लोकशाहीचा उत्सव)

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आणि क्षणही आहे. कारण धर्म, भाषा, जात, प्रांत, प्रदेश यांबाबत कोणताही समानता नसलेला देश म्हणजे भारत. परंतू, असे असले तरीही विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.