एलेना कोर्नारो पिसकोपिया Google Doodle: जगातील पहिली पीएच.डी प्राप्त महिला Elena Cornaro Piscopia यांच्या 373 व्या जयंती निमित्त गुगलने डुडल साकारत दिली मानवंदना
Elena Cornaro Piscopia Google doodle (Photo Credits: Google)

खास सणवार, थोरामोठ्यांची जयंती, स्मृतीदिन या निमित्ताने गुगल खास डुडल साकारुन तो दिवस साजरा करतं. अशाच एका खास महिलेच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल साकारात त्यांना मानवंदना दिली आहे. ही महिला म्हणजे जगातील पहिली पीएच.डी केलेली महिला एलेना कोर्नारो पिसकोपिया (Elena Cornaro Piscopia). एलेना यांचा जन्म इटलीत 5 जून 1646 मध्ये झाला. आज त्यांची 373 वी जयंती आहे. या निमित्ताने गुगुलने खास डुडल साकारले आहे.

ज्या काळात स्त्री शिक्षण अत्यंत दुर्मिळ होते किंवा शिक्षणाबद्दल अधिक जागृकता नव्हती. त्या काळात एलेना यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली. ही उत्तम कामगिरी करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या.

इटलीत जन्मलेल्या एलेना यांच्या वडीलांचे नाव जियानबेटिस्ता कॉर्नारो होते. तर आईलचे नाव जानेटा बोनी होते. पीएच.डी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनातील शेवटची सात वर्षे शिक्षणाचा प्रसार आणि चॅरिटी करण्यासाठी समर्पित केली. 26 जुलै 1648 साली इटलीतील पडुआ शहरात त्यांचा मृत्यू झाला.