Jyeshtha Gauri Pujan Messages In Marathi: पार्वतीचे साक्षात रुप असेलली ज्येष्ठागौरीचे गणेशभक्तांच्या घरी दणक्यात स्वागत झाले. गौरी आवाहनाच्या (Gauri Avahan) दुस-या दिवशी गौरी पूजन (Gauri Pujan) केले जाते. हा सण म्हणजे सुवासनींसाठी गणेश चतुर्थीच्या दिवसातील महत्त्वाचा सण मानला जातो. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ (Jyeshta Gauri Pujan) असे म्हटले जाते. आज सर्वत्र घरी आलेल्या गौरीचे पूजन करतील. यात कुणाकडे गोडाचा नैवेद्य तर कुणाकडे तिखटाचा नैवेद्य दाखवला जाईल. या सणाचा उत्साह सुवासनींमध्ये कायम राहावा यासाठी एकमेकींना शुभेच्छा संदेश पाठवणे ही चांगली संकल्पना असू शकते.
यंदा कोरोना व्हायरसमुळे सुवासिनी एकत्रित रित्या जमू शकत नाही म्हणून Greetings, Whatsapp Status, Facebook, Wishes च्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
काकणांसह पैजणांचा नाद कानी गुंजला
पार्वती-गौरी प्रकटली लेकरा भेटायला
घालुनी फुगड्या सयांनो हिला मनोरंजीत करा
लाडकी कन्या जणू, माहेरच्या आली घरा
गौरी पूजेच्या खूप खूप शुभेच्छा!
Gauri Pujan Messages in Marathi (Photo Credits: File)आली माझ्या गं अंगणी गौराई,
लाभो तुम्हास सुख समृद्धी,
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सोन्यामोत्यांच्या पावली आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया
घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हेदेखील वाचा- Gauri Pujan 2020 Ukhane: गौरी पूजनाला हमखास होणारा नाव घेण्याचा हट्ट पुरवण्यासाठी महिलांसाठी खास उखाणे !
गौरी गणपतीच्या आगमना,
सजली अवधी धरती,
सोनपावलाच्या रुपाने
ती येवो आपल्या घरी,
होवो आपली प्रगती,
लाभो आपणास सुख समृद्धी
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गवर गौरी ग गौरी ग,
झिम्मा फुगडी खेळू दे,
हिरव्या रानात रानात
गवर माझी नाचू दे
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तसेच गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी गौरीपूजन केले जाते. या दिवशी जेष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा करत फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचसोबत तिसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन केले जाते. परंतु गौरी विसर्जनापूर्वी दिवशी गौरींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते असे मानले जाते.